Acidity Home Remedies: आजच्या काळात पोटाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. तुम्हीही वारंवार होणाऱ्या ॲसिडिटी आणि पोटातील जळजळीमुळे त्रस्त असता का? तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. कारण आज आम्ही तुम्हाला अशा पाच पदार्थांबाबत माहिती सांगणार आहोत, जे या समस्येपासून आराम मिळवून देऊ शकतात. खरं तर अनेकदा ॲसिडिटी ही तिखट किंवा तळलेले-भाजलेले खाल्ल्यामुळेही होऊ शकते. नुकतेच न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी एक व्हिडीओ शेअर करून अशा पाच पदार्थांबाबत माहिती सांगितले आहे, ज्याचा डाएटमध्ये समावेश केल्यास ॲसिडिटीची समस्या दूर करून तणाव (स्ट्रेस) कमी करण्यासही मदत मिळू शकते.
काय खाल्ल्याने पोटात गॅस होत नाही
1. भिजवलेले अक्रोड आणि बदाम
रोज सकाळी भिजवलेले अक्रोड आणि बदाम खाणे पोटासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियम मेंदूला शांत ठेवण्याचे काम करते आणि पोटात तयार होणारी ॲसिडही कमी करते.
कसे खावे: रात्री 4-5 बदाम, 2 अक्रोड भिजत ठेवा आणि सकाळी साल काढून रिकाम्या पोटी खा.
2. केशर आणि भिजवलेल्या काळ्या मनुका
जर तुमच्या पोटात खूप जळजळ जाणवत असेल तर केशर आणि भिजवलेल्या काळ्या मनुका तुमच्या कामी येऊ शकते.
कसे खावे: एका ग्लास स्वच्छ पाण्यात रात्रभर मनुका आणि थोडेसे केशर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खा.
(नक्की वाचा : Methi Water Benefits: सलग 21 दिवस सकाळी रिकाम्या पोटी प्या मेथीचे पाणी, शरीरात वेगाने घडतील हे थक्क करणारे बदल)
3. हलके पिकलेले केळ
केळ पोटाच्या ॲसिडिटीसाठी रामबाण मानले जाते. पण लक्षात ठेवा केळे खूप जास्त पिकलेले किंवा खूप कच्चे नसावे. हलक्या पिकलेल्या केळ्यामध्ये ट्रिप्टोफॅन आणि व्हिटॅमिन B6 मुबलक प्रमाणात असते.
(नक्की वाचा: तुमची मांडी सांगणार तुम्ही किती वर्ष जगणार? डॉ. सेठींनी 12 वर्षांच्या रीसर्चमधील सांगितला मोठा खुलासा)
4. उकडलेले रताळे
रताळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स (Complex Carbs) असतात. जेव्हा तुम्ही रताळे खाता तेव्हा ते मेंदूला ट्रिप्टोफॅन शोषून घेण्यास मदत करते.
कसे खावे: हे नेहमी चांगल्या प्रकारे शिजवून आणि उकडूनच खा. तुम्ही याचा सॅलड बनवू शकता.
5. कॅमोमाइल टी आणि भोपळ्याच्या बिया
कॅमोमाइल टी, भोपळ्याच्या बिया पोटाच्या स्नायूंना आराम देण्यास आणि मेंदू शांत ठेवण्यास उपयुक्त ठरतात.
कसे सेवन करावे: रात्री झोपण्यापूर्वी कॅमोमाइल टी प्या आणि सोबत थोड्याशा भाजलेल्या भोपळ्याच्या बिया खाऊ शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world