Aadhaar Card Update : तुमचं आधार कार्ड 10 वर्षांहून जास्त जुनं आहे? मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी!

Aadhaar Card Update Online For Free: तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील नाव, पत्ता किंवा इतर माहिती ऑनलाइन अपडेट (Aadhaar card Update online) करायचे असेल, तर यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
Free Aadhaar Card Update Deadline : युआयडीएआय (UIDAI) ने सामान्य नागरिकांना दिलासा देत मोफत आधार अपडेट (Aadhaar Free Update) करण्याची संधी दिली आहे.
मुंबई:

Aadhaar Card Update Online For Free: आधार कार्ड आता प्रत्येक भारतीयासाठी एक आवश्यक कागदपत्र बनले आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी असो, बँकेशी संबंधित कोणतेही काम असो किंवा सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारची गरज लागते. पण बऱ्याचदा आधार कार्डवर नाव, पत्ता किंवा इतर माहिती चुकीची नोंदवली जाते, ज्यामुळे अनेक महत्त्वाची कामे अडकून पडतात.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम संधी!

युआयडीएआय (UIDAI) ने सामान्य नागरिकांना दिलासा देत मोफत आधार अपडेट (Aadhaar Free Update) करण्याची संधी दिली आहे. तुमच्या आधार कार्डमध्ये कोणतीही जुनी किंवा चुकीची माहिती असेल, तर तुम्ही 14 जून 2025 पर्यंत कोणतीही फी न देता ती अपडेट करू शकता.

यापूर्वीही ही सुविधा दिली गेली होती, ज्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2024 होती. परंतु ती वाढवून आता 14 जून 2025 करण्यात आली आहे.

14 जूननंतर किती शुल्क लागेल?

 तुम्ही या अंतिम मुदतीनंतर आधार अपडेट केले, तर त्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क ऑनलाइन अपडेटसाठी myAadhaar पोर्टलवर देखील लागू होईल.

याव्यतिरिक्त, जर तुम्हाला बायोमेट्रिक किंवा फोटोसारखी माहिती अपडेट करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावे लागेल.

( नक्की वाचा : Voter ID डाऊनलोड कसा करणार? वाचा सोपी पद्धत, काही मिनिटांमध्येच होईल काम )
 

ऑनलाइन आधार अपडेट कसे कराल?

तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील नाव, पत्ता किंवा इतर माहिती ऑनलाइन अपडेट (Aadhaar card Update online) करायचे असेल, तर यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही UIDAI च्या https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटवर जाऊन घरबसल्या हे काम करू शकता. ही सर्व पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Advertisement

सर्वात आधी वेबसाइटवर लॉगिन करा.
तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा टाका आणि ओटीपीच्या मदतीने लॉगिन करा.
आता 'Document Update' या पर्यायावर क्लिक करा आणि जी माहिती अपडेट करायची आहे, ती निवडा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
सबमिट करताच तुम्हाला एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल, ज्यावरून तुम्ही अपडेटची स्थिती तपासू शकता.

10 वर्षे जुन्या आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना


UIDAI ने नुकतीच एक महत्त्वाची माहिती दिली आहे. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षे जुने झाले असेल, तर ते अपडेट करणे आवश्यक आहे. हे अपडेट देखील 14 जून 2025 पर्यंत मोफत (Free Aadhaar update) केले जाऊ शकते.
 

Advertisement