- सही टेम्परेचर सेट करने से AC की बिजली खपत कम होती है
- पंखे और AC साथ चलाने से बेहतर कूलिंग और बचत भी
- नियमित मेंटेनेंस से AC की एफिशिएंसी और परफॉर्मेंस बढ़ती है
उन्हाळा येताच सर्वात मोठं टेन्शन तापमानाचं नाही, तर विजेच्या बिलाचं असतं. या काळात वाढत्या उकाड्यामुळे एसी सुरू करावाच लागतो. मात्र महिन्याअखेरीस विजेचं बिल पाहताच हा थंडावा किती महागात पडला हे लक्षात येतं. अनेक कुटुंबात एसी योग्य पद्धतीने वापरला जात नाही. चुकीचं टेम्परेचर, अपुरं मेन्टेनन्स आणि चुकीच्या सेटिंग्समुळे कुलिंग कमी मिळतं आणि विजेचा जास्त वापर होतो. चांगली बाब म्हणजे, काही लहान-मोठे बदल केल्यास तुम्ही एसीतून चांगली कुलिंग मिळवू शकता आणि विजेचं येणारं बिलही कमी असतं.
१. योग्य तापमान आहे खरा गेम...
सर्वात आधी तापमानाच्या सेटिंग्जबद्दल बोलूया. २४ डिग्री एक बॅलेन्स्ड पॉइंट मानलं जातं. अनेक लोक एसीला १८ किंवा २० डिग्रीवर सेट करतात. यामुळे खोली लवकर थंड होईल असा विचार केला जातो. मात्र, एसीचा थंड होण्याचा वेग तोच राहतो. फरक फक्त एवढाच आहे की, कम्प्रेसर जास्त वेळ चालतो. ज्यामुळे जास्त वीज वापरली जाते. एसी २४ डिग्रीवर सेट केल्याने उत्तम थंडावा मिळतो आणि विजेची बचतही होते.
२. खोली पूर्णपणे बंद झाली नाही तर कुलिंग वाया...
खोली योग्य पद्धतीने बंद करायला हवी. जर दरवाजा-खिडक्यांतून हवा बाहेर जात असेल किंवा ऊन खोलीत येत असेल तर एसीला खूप काम करावं लागतं. जाड पडदे, दरवाजे पूर्णपणे बंद करणे आणि ऊन रोखल्याने कुलिंग अधिक लवकर होतं. यामुळे एसीवर लोड कमी पडतो आणि लवकर खोली थंड होते.
३. एसीसोबत पंखा का आहे आवश्यक?
आणखी एक महत्त्वाची चूक म्हणजे लोक एसी लावल्यावर पंखा बंद करतात. सीलिंग फॅनसह एसी लावणं अधिक परिणामकारक असतं. पंख्यामुळे थंड हवा खोलीभर पसरते. ज्यामुळे एसीला वारंवार कंप्रेसर चालवण्याची आवश्यकता भासत नाही. यामुळे विजेचा वापर कमी होतो आणि खोलीमध्ये एकसमान थंडावा मिळतो.
४. Inverter AC योग्य पद्धतीने वापरा...
तुमच्याकडे इन्व्हर्टर एसी असेल तो वारंवार चालू-बंद करण्याऐवजी सतत चालू ठेवणे चांगलं आहे. हे तंत्रज्ञान गरजेनुसार आपोआप आपला वेग निश्चित करते, ज्यामुळे विजेचा वापर कमी होतो. रात्री 'स्लीप मोड' आणि 'टायमर' वापरल्यानेही लक्षणीय बचत होऊ शकते.
५. मेटेन्ससमुळे मिळतो चांगला थंडावा...
अनेकदा एसीच्या मेटेन्ससकडे दुर्लक्ष केलं जातं. मूळात हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. एसीच्या फिल्टरवर धूळ जमा झाली असेल तर हवेचा फ्लो कमी होतो. ज्यामुळे मशीनला जास्त मेहनत करावी लागते. दर १५ ते २० दिवसात फिल्टर स्वच्छ करणं आणि वेळो-वेळी सर्विसिंग करणं कुलिंग आणि कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहे.
६. आऊटडोअर युनिटची जागाही महत्त्वाची...
एसीची आऊटडोअर युनिटची स्थानामुळेही मोठा फरक पडतो. जर हे मशीन थेट उन्हात असेल किंवा हवेचा फ्लो नसेल तर मशील लवकर गरम होते आणि कुलिंगची क्षमता कमी होते. हे मशीन सावलीत ठेवा आणि त्याच्या आजूबाजूला जागा ठेवल्यास चांगला फायदा मिळतो.
७. चांगल्या क्षमतेचा एसी निवडा...
जर तुमची खोली मोठी असेल आणि एसी लहान असेल तर जास्त वेळ एसी सुरू ठेवावा लागेल. अशात ज्या जागेत एसी बसवायचा आहे, त्या जागेचे क्षेत्रफळ मोजून त्यानुसार एसीची निवड करणं शहाणपणाचं ठरतं. साधारणपणे, १३० चौरस फूट खोलीसाठी १ टन एसी, १३०-२०० चौरस फुटांसाठी १.५ टन आणि २००-३०० चौरस फुटांच्या जागेसाठी २ टन एसी योग्य असतो.
८. स्मार्ट/AI फीचरचा करा वापर...
सध्याचे एसी स्मार्ट झाले आहेत. यामध्ये AI फीचरचा समावेश असतो. जे स्वत: एसीला जुळवून घेतात आणि विजेचा कमी वापर करीत चांगलं कुलिंग देतात. हे एसी वाय-फाय सपोर्टने सुसज्ज असतात आणि वापरकर्ते त्यांना ॲपद्वारे नियंत्रित करू शकतात. तुम्ही ॲपमध्ये स्वतः सर्वोत्तम सेटिंग्ज सेट करू शकता. यामध्ये, संपूर्ण दिवस किंवा रात्रीसाठी एक प्रोफाइल तयार करता येते, ज्यामध्ये एसी एका निश्चित वेळेत तुम्ही सेट केलेल्या तापमानावरच सेट केला जातो