Adhik Maas Anarsa Recipe: हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पवित्र महिन्यात केल्या जाणाऱ्या विविध दानांमध्ये 'अपूपदान' म्हणजेच अनारशांच्या दानाला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. शास्त्रानुसार अधिक मासात 33 कोटी देवतांचे अधिष्ठान असते, त्यामुळे या काळात 33 अनारसे दक्षिणेसह योग्य ब्राह्मणाला किंवा गरजूंना दान केल्यास अक्षय पुण्य लाभते. घरामध्ये सुख-समृद्धी वाढवण्यासाठी आणि सर्व पापांतून मुक्ती मिळवण्यासाठी हे विशेष दान कसे करावे.
अधिक मासानिमित्त तुम्ही देखील घरच्याघरी अनारसे तयार करण्याचा विचार करताय का? तर या लेखाद्वारे अनारशांची रेसिपी जाणून घेऊया...
सोशल मीडियावरील Trupti's Kitchen Katta या पेजने शेअर केलेली अनारशांची रेसिपी नोट करा...
अनारसे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य | Anarsa Recipe In Marathi
- जुना तांदूळ (कोलम/बासमती/रेशनचा तांदूळ) - 2 वाटी
- गूळ (किसलेला) 1½ वाटी (3/4 प्रमाण)
- खसखस 1½ वाटी
- तूप - 2 चमचे (मळण्यासाठी)
- तळण्यासाठी तेल
अनारसे तयार करण्याची स्टपे-बाय-स्टेप कृती
1. तांदूळ भिजवणे
तांदूळ स्वच्छ धुवून सलग तीन दिवस भिजत ठेवा. दररोज पाणी बदलत राहा.
2. तांदूळ वाळवणे
निथळलेला तांदूळ सावलीत सुती कापडावर 3-4 तास पसरवा. तांदूळ थोडा ओलावा राहू द्यावा.
(नक्की वाचा : Adhik Maas 2026: अधिक मासात मुलीला चांदीची जोडवी का देतात? ज्योतिषी जोशींनी सांगितलेले 5 फायदे ऐकून थक्क व्हाल)
3. तांदूळ दळणे
ओलसर तांदूळ बारीक वाटून घ्या. पीठ मऊ असावे.
4. गूळ मिक्स करणे
किसलेला गूळ पिठात घाला (1 वाटी पीठ: 3/4 वाटी गूळ). तूप मिक्स करून पीठ मळा. पीठ तीन ते चार तास झाकून ठेवा.
5. अनारसे थापणे
हाताला हलके तूप लावा. पिठाचे गोळे घेऊन थापून अनारसे तयार करा आणि एका बाजूला खसखस लावा.
(नक्की वाचा : Adhik Maas 2026: अधिक मासात दीपदान का करावे? 9 प्रमुख तिथीसह 33 संख्येचं महत्त्व, वाचा वेदमूर्तींची माहिती)
6. अनारसे तळणे
गॅसच्या मध्यम आचेवर तेल गरम करा. खसखस असलेली बाजू वर ठेवा आणि अनारसे तेलात सोडा.
महत्त्वाच्या टिप्स
- नेहमी जुना तांदूळ वापरावा.
- पीठ पातळ वाटले तर तांदळाचे पीठ मिक्स करा.
- अनारसे विरघळत असतील तर पिठात दोन चमचे गरम तूप मिक्स करा.
- पीठ घट्ट असेल तर तुपाचा हात लावा किंवा केळ्याचा तुकडा मिक्स करा.
- गॅसच्या मंद आचेवर अनारसे तळावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)