- 17 मे ते 15 जून पर्यंत अधिक ज्येष्ठ मास असणार असून हिंदू धर्मशास्त्रात हा अतिशय पवित्र मानला जातो.
- अधिक मासात स्नान, जप, विष्णुपूजन, दीपदान आणि पितृतर्पण केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते आणि पितृदोष दूर होतो
- अधिक मासात 33 कोटी देवतांचे अधिष्ठान असते, 33 अनारसे, फळे किंवा वस्तूंचे दान करणे अक्षय पुण्यदायी ठरते
- वेदमूर्ती युवराज दिवेकर गुरुजी
Adhik Maas 2026: हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे. सन 2026 मध्ये आलेला हा पुण्यपर्वकाळ ज्येष्ठ महिन्यात आल्यामुळे याला 'अधिक ज्येष्ठ मास' असे म्हटले जाते. त्याचा कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असा आहे. वेदमूर्ती युवराज दिवेकर गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिक ज्येष्ठ मासात स्नान, जप, विष्णुपूजन, दीपदान आणि पितृतर्पणाला विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार या महिन्यात 33 कोटी देवतांचे अधिष्ठान असते, ज्यामुळे दानधर्म करताना 33 या संख्येला प्राधान्य दिले जाते. 33 अनारसे, फळे किंवा वस्तूंचे दान केल्याने अक्षय पुण्य लाभते. वेदमूर्ती युवराज दिवेकर गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळात सात्विक जीवनशैलीचे पालन करत नामस्मरण आणि दीपदान केल्यास घरातील क्लेश दूर होऊन सुख-समृद्धी लाभते आणि पितृदोषातून मुक्ती मिळते. वेदमूर्ती युवराज दिवेकर गुरुजी यांनी अधिक मासाबाबत दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...
अधिक ज्येष्ठ मास 2026 कालावधी | Adhik Jyeshtha Maas 2026 Duration
17 मे 2026 ते 15 जून 2026
अधिक ज्येष्ठ मास असे का म्हणतात? | Why is it called Adhik Jyeshtha Maas?
यावेळी आलेला हा पुण्यपर्वकाळ ज्येष्ठ मासात आल्यामुळे यास 'अधिक ज्येष्ठ मास' असे म्हणतात. या दिवशी स्नान, जप, दान, विष्णुपूजन, तुळशी सेवा आणि आणि पितृतर्पण केल्यास विशेष पुण्याप्त होते.
(नक्की वाचा : Adhik Maas 2026: अधिक मास म्हणजे काय? काय करावे, काय टाळावे? 33 आकड्याचे विशेष महत्त्व, वाचा ज्योतिषी कुलकर्णींनी दिलेली माहिती)
अधिक मास 2026 - प्रमुख तिथी | Adhik Maas 2026 - Key Dates
- 17 मे - 25 मे गंगा दशहरा पर्वकाळ
- 21 मे गुरु पुष्यामृत योग
- 27 मे व्यतिपात योग तथा एकादशी
- 28 मे द्वादशी
- 31 मे पौर्णिमा
- 7 जून वैधृती योग
- 11 जून एकादशी
- 12 जून द्वादशी
- 15 जून सोमवती अमावस्या
अधिक मासात नद्यांमध्ये स्नानाचे मोठे फळ आहे. शक्य असल्यास गंगा दशहरा काळात पवित्र स्नान करावे किंवा घरीच गंगेचे स्मरण करून स्नान करावे.
(नक्की वाचा : Adhik Maas 2026: अधिक मासात मुलीला चांदीची जोडवी का देतात? ज्योतिषी जोशींनी सांगितलेले 5 फायदे ऐकून थक्क व्हाल)
अधिक मासातील दान महिमा | Significance of Charity in Adhik Maas
33 अनारसे दान: या मासात '33' या संख्येला विशेष महत्त्व आहे. 33 अनारसे, 33 फळे किंवा 33 वस्तूंचे दान ब्राह्मणाला किंवा गरजूंना दिल्यास अक्षय पुण्य मिळते.
अधिक मासातील नित्य उपासना | Daily Rituals and Worship in Adhik Maas
- भगवान विष्णूंचे पूजन आणि नामस्मरण
- श्री पुरुषोत्तम स्तोत्राचे पठण
- तुळशीची विशेष सेवा आणि दीपदान
- अन्नदान आणि गोरक्षण
- नित्य उपासनाः दररोज करायची महत्त्वाची धार्मिक कृत्ये
अधिक मासातील पाळावयाचे पथ्य | Rules and Discipline to Follow in Adhik Maas
- या काळात विवाहादी मंगल कार्ये केली जात नाहीत.
- तामसिक आहार (मांसाहार, कांदा, लसूण, मद्यपान) टाळून सात्विक आहार घ्यावा.
- कोणाचीही निंदा-नालस्ती करू नये आणि असत्य बोलणे टाळावे.
- सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावे आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे.
- राग आणि द्वेषावर संयम ठेवावा.
33 कोटी देव आणि अधिक मास | 33 Crore Gods and Adhik Maas
- 33 कोटी देवतांचे अधिष्ठान शास्त्रानुसार या महिन्यात 33 कोटी देवतांचे अधिष्ठान असते.
- महत्त्वाच्या 33 देवतांचे पूजन 12 आदित्य, 8 वसू, 11 रुद्र आणि 2 अश्विनीकुमार
- 33 संख्या दान म्हणून दान देताना 33 ही संख्या प्रमाण मानली जाते.
भगवान श्रीकृष्णाचे वचन | Lord Krishna's Promise
श्रीमद्भागवत पुराणानुसार, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "जो व्यक्ती या मासात माझी भक्ती करेल, त्याचे सर्व पाप त्याला वैकुंठ प्राप्त होईल.” वेदमूर्ती वराज दिवेकर गुरुजी म्हणूनच याला 'पुरुषोत्तम मास' म्हटले जाते.
अधिक मासातील दीपदानाचे विशेष महत्व | Special Significance of Donating Lamps in Adhik Maas
अज्ञान दूर करणारा दीप: या महिन्यात दररोज देवासमोर आणि तुळशीसमोर अखंड दिवा लावल्याने घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि कुटुंबातील क्लेश दूर होतात.
अधिक मासातील पितृदोष निवारण संधी | Opportunity for Pitru Dosha Removal in Adhik Maas
अधिक मासात केवळ देवांचीच नव्हे, तर पितरांची सेवा केल्याने 'अधोलोकात' अडकलेल्या पूर्वजांना मुक्ती मिळते. या महिन्यात केलेले 'अन्नदान' पितरांना अक्षय तृप्ती देते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)