जाहिरात

Adhik Maas 2026: अधिक मासात मुलीला चांदीची जोडवी का देतात? ज्योतिषी जोशींनी सांगितलेले 5 फायदे ऐकून थक्क व्हाल

Adhik Maas 2026 Significance: अधिक मासात विवाहित मुलीला चांदीची जोडवी (बिछवे) का दिली जातात? त्यामागील धार्मिक महत्त्व आणि वैज्ञानिक शास्त्र काय आहे? जाणून घ्या प्रसिद्ध ज्योतिषी गुरुजी वैभव जोशी यांनी दिलेली सविस्तर माहिती.

Adhik Maas 2026: अधिक मासात मुलीला चांदीची जोडवी का देतात? ज्योतिषी जोशींनी सांगितलेले 5 फायदे ऐकून थक्क व्हाल
"Adhik Maas 2026: अधिक मासमध्ये लेकीला चांदीच्या जोडवी का दिल्या जातात?"
Gemini AI

- गुरुजी वैभव जोशी

Adhik Maas 2026: हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला 'पुरुषोत्तम मास' असे म्हटले असून, या काळाला आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा काळ जप-तप, दानधर्म आणि कौटुंबिक नातेसंबंध दृढ करण्यासाठी अत्यंत लाभदायी मानला जातो. याच पवित्र महिन्याचे औचित्य साधून लेकीच्या सुखी संसारासाठी आणि तिच्या अखंड सौभाग्यासाठी तिला 'जोडवी' (बिछवे) भेट देण्याची एक सुंदर आणि समृद्ध परंपरा आपल्याकडे आहे.

गुरुजी वैभव जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिक मासात मुलीला जोडवी देणे ही केवळ एक कौटुंबिक भेट नसून त्यामागे एक सखोल धार्मिक आणि वैज्ञानिक शास्त्र दडलेले आहे. चांदी ही चंद्राची धातू असल्याने ती स्त्रीचे मन, शांती आणि आरोग्याचे प्रतीक मानली जाते. तसेच जोडवी घातल्याने पायातील नसांवर पडणारा दाब तिच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. लेकीला चांदीची जोडवी भेट देण्यामागचे शास्त्र काय आहे? याबाबत ज्योतिषी वैभव जोशी यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया...

अधिक मासात मुलीला जोडवी का देतात? त्यामागे शास्त्र काय आहे? | Why do people gift toe rings to daughters in Adhik Maas? What is the science behind it?

  1. अधिक मास हा पुण्याचा, दान-धर्माचा आणि शुभकार्याचा महिना मानला जातो.
  2. या महिन्यात मुलींला जोडवी (चांदीची बिछवे) देण्याची परंपरा आहे.
  3. ही केवळ भेट नसून प्रेम, आशीर्वाद आणि सुखी संसाराची मंगल कामना असते.

लाडक्या लेकीला चांदीची जोडवी देण्यामागील परंपरेबाबत शास्त्र काय सांगते?

शास्त्र काय सांगते ? | What do the Scriptures say?

  1. पद्मपुराण, स्कंदपुराण आणि धर्मशास्त्रात अधिक मासाला सर्व दान, जप, तप, स्नान यांचे विशेष महत्त्व सांगितले आहे.
  2. मुलीला जोडवी देणे म्हणजे तिच्या स्त्रीत्त्व, वैवाहिक सुख, आरोग्य आणि अखंड सौभाग्याची कामना होय.
  3. चांदी ही चंद्राची धातू मानली गेली आहे. चंद्र मन, शांती, मातृत्य आणि स्त्री-सुखाचे प्रतीक आहे.
  4. जोडवीने पायातील नसांवर सौम्य दाब पडतो,त्यामुळे आरोग्यास फायदेशीर असते, असेही शास्त्रात नमूद आहे.
(नक्की वाचा : Adhik Maas 2026: अधिक मास म्हणजे काय? काय करावे, काय टाळावे? 33 आकड्याचे विशेष महत्त्व, वाचा ज्योतिषी कुलकर्णींनी दिलेली माहिती)चांदीच्या जोडवीचे महत्त्व | Importance of Silver Toe Rings
  1. वैवाहिक सौभाग्य वाढते.
  2. पती-पत्नीमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढतो.
  3. आयुष्यातील अडचणी कमी होतात.
  4. पायातील नसा सक्रिय होतात, आरोग्य सुधारते.
  5. चंद्रदोष शांत होतो, मनःशांती मिळते.
  6. मुलींच्या आयुष्यात स्थिरता प्राप्त होते.

अधिक मासात मुलीला काय-काय द्यावे? | What should be gifted to the daughter in Adhik Maas?

  1. जोडवी
  2. हळद-कुंकू
  3. साडी किंवा ड्रेस
  4. फळे
  5. नारळ
  6. दक्षिणा
  7. चांदीचे पैजण (ऐच्छिक)
  8. मेंदी
  9. कंगवा
  10. आरसा
  11. फुले
  12. गोड पदार्थ

आणखी कोणत्या वस्तू भेटस्वरुपात देता येऊ शकतील? | What other items can be given as gifts?

  1. पर्स/ वॉलेट
  2. बांगड्या
  3. पेन
  4. सौंदर्य प्रसाधने
  5. घड्याळ
  6. धूप अगरबत्ती
  7. देवाची मूर्ती
  8. तांब्या /लोटा

अधिक मासातील विशेष दान केल्यास कोणते लाभ मिळतात? | What are the benefits of special charity in Adhik Maas?

  1. पुण्यफळ अनेक पटीने वाढते
  2. पितर दोष, ग्रहदोष कमी होतात
  3. घरात सुख-शांती समृद्ध वाढते
  4. मुलीचा संसार सुखमय होतो
  5. आयुष्यात स्थैर्य आणि समाधान मिळते
  6. देवाची कृपा आणि आशीर्वाद लाभतात

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जिम्मेदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com