Airtel ग्राहकांना बसू शकतो मोठा झटका! आपोआप कापले जाऊ शकतात पैसे? काय आहे कारण?

एअरटेलने गेल्या वर्षी आपल्या युजर्सना दिलेली 'Perplexity Pro AI' ची मोफत सेवा आता संपणार आहे. कंपनीने युजर्सना ऑटो-रिन्यूअल संदर्भात अलर्ट मेसेज पाठवण्यास सुरुवात केली

जाहिरात
Read Time: 2 mins

एअरटेलचे (Airtel) ग्राहक असाल आणि गेल्या वर्षापासून मोफत 'Perplexity Pro AI' सबस्क्रिप्शनचा आनंद घेत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. एअरटेलने आपल्या युजर्सना दिलेली ही मोफत सेवा आता संपुष्टात येणार आहे. एआय (AI) कंपनी 'Perplexity' आणि 'Airtel' यांनी गेल्या वर्षी भागीदारी करून एअरटेलच्या निवडक पोस्टपेड, प्रीपेड आणि वाय-फाय प्लॅन्सवर तब्बल 17 हजार रुपयांचे 1 वर्षाचे प्रो सबस्क्रिप्शन मोफत दिले होते.

आता हा मोफत कालावधी संपत आल्यामुळे, एअरटेल आपल्या ग्राहकांना रिन्यूअल संदर्भात अलर्ट मेसेज पाठवत आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्हाला ही एआय चॅटबॉट सेवा पुढेही सुरू ठेवायची असेल, तर आता तुम्हाला पैसे मोजावे लागतील. अन्यथा, खात्यातून पैसे वजा होऊ नयेत म्हणून हे सबस्क्रिप्शन त्वरित रद्द करावे लागेल.

Advertisement

एअरटेलकडून ग्राहकांना अलर्ट मेसेज

ज्या एअरटेल युजर्सनी गेल्या वर्षी या फ्री ऑफरसाठी साईन-अप (Sign-up) केले होते, त्यांना कंपनीकडून मेसेजद्वारे सूचित केले जात आहे. या मेसेजमध्ये लिहिले आहे की, "तुमचे वार्षिक Perplexity सबस्क्रिप्शन रिन्यू होणार आहे. जर तुम्हाला हे सबस्क्रिप्शन पुढे सुरू ठेवायचे नसेल, तर अतिरिक्त चार्जेस टाळण्यासाठी रिन्यूअलच्या तारखेपूर्वी तुमचे ऑटो रिन्यूअल (Auto Renewal) कॅन्सल करा."

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

Perplexity Pro सबस्क्रिप्शन कसे रद्द करावे? 

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील Perplexity App ओपन करा.
  • ॲपमधील तुमच्या Profile सेक्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर 'All Settings' या पर्यायावर क्लिक करा.
  • तिथे 'Perplexity Pro सबस्क्राइब करण्यासाठी धन्यवाद' असा सेक्शन दिसेल, त्याच्या अगदी बाजूला असलेल्या 'Manage' या ऑप्शनवर क्लिक करा.
  • पुढील विंडोमध्ये पुन्हा एकदा 'Manage' हा पर्याय निवडा.
  • आता स्क्रीनवर दिसणाऱ्या 'Cancel Subscription'(कॅन्सल सबस्क्रिप्शन) या पर्यायाची निवड करा.
  • सबस्क्रिप्शन रद्द करण्याचे कारण विचारले जाईल, तिथे 'Other' पर्याय निवडून तुमचे कारण लिहा.
  • यानंतर एक कन्फर्मेशन विंडो उघडेल, तिथे 'Continue to Cancel' हा पर्याय निवडा.
  • पुढील स्क्रीनवर पुन्हा एकदा 'No Thanks, Cancel My Subscription' हा पर्याय सिलेक्ट करा.
  • शेवटी तुमचा बिलिंग पिरियड निवडून अंतिम प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा 'Cancel Subscription' वर क्लिक करा.

(नक्की वाचा-  Rain News: गायब झालेला मान्सून पुन्हा सक्रिय, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट')

कुणाला सबस्क्रिप्शन रद्द करण्याची गरज नाही?

एअरटेलच्या ज्या ग्राहकांनी गेल्या वर्षी या ऑफरचा लाभ घेताना कोणत्याही प्रकारची पेमेंट माहिती (जसे की क्रेडिट किंवा डेबिट कार्ड डिटेल्स) जोडली नव्हती, अशा युजर्सना हा मेसेज आला तरी घाबरण्याची गरज नाही. ते या मेसेजकडे दुर्लक्ष करू शकतात, कारण माहिती नसल्याने त्यांचे पैसे कापले जाणार नाहीत. मात्र, ज्या युजर्सनी साईन-अप करताना कार्ड डिटेल्स जोडले होते, त्यांनी बिलिंग सायकल सुरू होण्यापूर्वी वरील प्रक्रियेद्वारे सबस्क्रिप्शन नक्की रद्द करावे.
 


Topics mentioned in this article