- कंपनी ने कई रिचार्ज पैक महंगे कर दिए हैं।
- Airtel ने रोमिंग पैक की कीमतों में बढ़ोत्तरी कर दी है।
- इसमें Rs 118 रुपये के रोमिंग पैक से लेकर 1198 रुपये तक के पैक्स शामिल।
Airtel Tariff Hike : एअरटेल ग्राहक असाल तर तुम्हाला रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. एअरटेलचे (Airtel) ग्राहक परदेशात सुट्टी घालवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या खिशाला आता थोडा जास्त कात्री बसणार आहे. एअरटेलने आपल्या इंटरनॅशनल रोमिंग (IR) पॅकच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अगदी 118 रुपयांपासून ते 1198 रुपयांपर्यंतच्या विविध प्लॅन्सचा समावेश आहे.
कोणते रोमिंग प्लॅन्स झाले महाग?
एअरटेलने आपल्या पोर्टफोलिओमधील अनेक लोकप्रिय रोमिंग पॅकच्या किमती बदलल्या आहेत. एअरटेलने त्यांच्या 98 रुपयांच्या रोमिंग पॅकची किंमत 118 रुपयांपर्यंत वाढवली आहे. या पॅकची वैधता 28 दिवसांची आहे. या कालावधीत युजर्सना येणारे मेसेज मिळतात. मात्र डेटा, व्हॉइस किंवा टेक्स्ट मेसेजसाठी मानक शुल्क लागू होतात.
Airtel IR Rs 649 Pack
एअरटेलने त्यांचा 649 रुपयांचा रोमिंग पॅक 698 रुपयांपर्यंत वाढवला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 1 दिवसाची वैधता, 1 जीबी हाय-स्पीड डेटा, 10 मोफत एसएमएस आणि भारतात 100 मिनिटे कॉलिंग मिळते. स्थानिक इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल देखील समाविष्ट आहेत.
Airtel IR Rs 798 Pack
एअरटेलने त्यांचा 798 रुपयांचा प्लॅन 898 रुपयांपर्यंत वाढवला आहे. या प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा, 150 मिनिटे कॉलिंग, 20 मोफत एसएमएस मेसेज आणि लोकल इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल्स मिळतात. याची वैधता 5 दिवसांची आहे.
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? धक्कादायक बाब आली समोर)
Airtel IR Rs 1098 Pack
एअरटेलने त्यांचा 1098 रुपयांचा रोमिंग पॅक 1198 रुपयांपर्यंत वाढवला आहे. या प्लॅनमध्ये 10 दिवसांची वैधता, 3 जीबी डेटा, 20 मोफत एसएमएस संदेश आणि 200 मिनिटे कॉलिंग उपलब्ध आहे. लोकल इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल उपलब्ध आहेत.
ग्राहकांवर काय होणार परिणाम?
एअरटेलच्या या दरवाढीमुळे परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी, व्यावसायिक कामासाठी प्रवास करणारे लोक आणि पर्यटकांना जादा पैसे खर्च करावे लागणार आहेत. विशेषतः 118 चा प्लॅन जो केवळ मेसेज प्राप्त करण्यासाठी वापरला जायचा, तो आता महाग झाला आहे.
(नक्की वाचा- Sell Old Clothes: जुने कपड्यांमधून पैसे कमावयचेत? ही ट्रीक 99.9% लोकांना माहिती नाहीये)
बदललेल्या प्लॅन्सची वैशिष्ट्ये
महागड्या पॅक्समध्ये भारतासाठी ठराविक मिनिटे कॉलिंग आणि लोकल इनकमिंग/आउटगोइंगची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी 1GB ते 3GB पर्यंत हाय-स्पीड डेटा या पॅक्समध्ये उपलब्ध आहे. सर्व नवीन प्लॅन्समध्ये मोफत एसएमएसची मर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे.
एअरटेलने ही दरवाढ अशा वेळी केली आहे जेव्हा जागतिक स्तरावर टेलिकॉम कंपन्या आपल्या सेवांच्या गुणवत्तेसाठी आणि पायाभूत सुविधांच्या खर्चासाठी दरवाढ करत आहेत. ग्राहकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी एअरटेलच्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवर जाऊन सुधारित दर तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world