Aja Ekadashi 2025 Date: अजा एकादशी कधी आहे? जाणून घ्या व्रत, पूजा विधी, तिथी, धार्मिक महत्त्व, लाभाची माहिती

Aja Ekadashi 2025 Kadhi Ahe: जीवनातील सर्व दुःख दूर करणारी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळणारी अजा एकादशीचे व्रत कधी आहे? श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला येणाऱ्या या व्रताची पूजा करण्याची पद्धत, शुभ मुहूर्त आणि धार्मिक फायदे जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Aja Ekadashi 2025 Date And Time: अजा एकादशी 2025 कधी आहे?"

Aja Ekadashi 2025 Date and Puja Vidhi: हिंदू धर्मातील मान्यतेनुसार भगवान विष्णूंची कृपादृष्टी व्हावी यासाठी एकादशी व्रत करणे अतिशय फलदायी मानले जाते. पंचांगानुसार हे व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या एकादशी (Ekadashi Vrat) तिथीला केले जाते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीबाबत सांगायचे झाले तर हिंदू धर्मामध्ये ही तिथी 'अजा एकादशी' व्रत (Aja Ekadashi 2025 Vrat) म्हणून ओळखले जाते. हे व्रत केल्यास भगवान श्री हरी भाविकांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात, असे म्हणतात. अजा एकादशी व्रताची पूजा करण्याची विधी, शुभ वेळ आणि धार्मिक महत्त्व याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अजा एकादशी कधी आहे? (When Is Aja Ekadashi 2025)

पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्यातील एकादशी तिथी (Ekadashi) 18 ऑगस्ट 2025 संध्याकाळी 05:22 वाजता सुरू होणार असून 19 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी  03:32 वाजेपर्यंत तिथी असेल. उदयातिथीनुसार असंख्य सुखांचा वर्षाव करणारी अजा एकादशीचे व्रत 19 ऑगस्ट 2025 मंगळवारी केले जाईल. व्रताचे पारण 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 05:53 वाजेपासून ते सकाळी 08:29 वाजेदरम्यान केले जाऊ शकते. 

अजा एकादशी व्रत विधी (Aja Ekadashi 2025 Vrat Vidhi)

  • अजा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही महिन्याच्या दशमी तिथीच्या रात्रीपासूनच नियमांचे पालन करण्यास सुरुवात करावी. या व्रताशी संबंधित परंपरा आणि नियम एकूण तीन दिवस पाळले जातात. 
  • एकादशी तिथीला या व्रताची विशेष पूजा करावी. याकरिता पहाटे स्नान आणि ध्यान केल्यानंतर घराच्या ईशान्य, पूर्व किंवा उत्तर दिशेला चौरंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेवावे आणि त्यावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. 
  • मूर्तीवर शुद्ध पाणी शिंपडावे तसेच मूर्तीजवळ कलशामध्ये गंगाजल भरुन ठेवावे. कलशामध्ये आंब्याच्या डहाळ्या ठेवून त्यावर श्रीफळ ठेवावे. यानंतर दिवा प्रज्वलित करुन पूजेस सुरुवात करावी.  
  • सर्वप्रथम कलश देवतेला कुंकू चंदन अर्पण करून पूजा करावी. यानंतर श्री हरीस पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाचे चंदन आणि पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करुन पूजा करावी. 
  • भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये चुकूनही अक्षतांचे वापर करू नये. तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने उपवासाच्या आदल्या रात्री आणि व्रताच्या दिवशी भात खाऊ नये. 
  • उपवासाच्या दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला हा उपवास सोडावा, कारण त्याशिवाय हा उपवास पूर्ण मानला जाणार नाही.  

अजा एकादशी व्रताचे धार्मिक महत्त्व (Aja Ekadashi 2025 Importance)

  • अजा एकादशी व्रत केल्यास भाविकावर भगवान विष्णूंची कृपादृष्टी होऊन त्याच्या जीवनातील दु:ख-दारिद्रय दूर होते, असे म्हणतात. 
  • भगवान विष्णूच्या आशीर्वादामुळे सुख संपत्ती समृद्धी प्राप्त होते, असेही म्हणतात.  
  • हिंदू मान्यतेनुसार अजा एकादशीचे व्रत केल्याने मागील आणि वर्तमान जन्मातील पापांचा नाश होतो. 
  • अजा एकादशीचे व्रत केल्यास शरीर आणि मन दोन्ही शुद्ध राहते. या व्रतामुळे आध्यात्मिक विकासाकडे वाटचाल होते.
  • आत्मसंयम वाढण्यास मदत मिळते.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)