Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेचा अर्थ काय? पितृदोषापासून मुक्ती हवी?श्रीकेतन गुरुजींकडून विधी जाणून घ्या

Akshaya Tritiya 2026 News: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला पितरांच्या आशीर्वादासाठी 'उदक कुंभ दान' कसे करावे? श्रीकेतन गुरुजींकडून जाणून घ्या पूजेची विधी आणि महत्त्व.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Akshaya Tritiya 2026 Puja Vidhi: श्रीकेतन गुरुजींकडून जाणून घ्या अक्षय तृतीयेच्या पूजेची विधी आणि महत्त्व"
Canva

Akshaya Tritiya 2026 News: हिंदू धर्मात वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया म्हणजेच 'अक्षय्य तृतीया' सण, या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्षय (अक्षय्य) तृतीया हा दिवस साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला जातो. हा दिवस केवळ सोने खरेदीसाठीच नाही, तर नवीन कामांचा शुभारंभ करण्यासाठीही अत्यंत फलदायी मानला जातो. पण तुम्हाला अक्षय तृतीया या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? जाणून घेऊया अर्थ...

अक्षय्य तृतीया या शब्दाचा अर्थ काय?

अक्षय म्हणजे क्षय न पावणारे, म्हणजेच नाश न होणारे म्हणूनच या दिवशी केलेली कोणतेही काम शेवटपर्यंत टिकते, असे म्हणतात. या दिवशी गृहप्रवेश, लग्न, नवीन कामाचा आरंभ अशा गोष्टी आवर्जून करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेले दान देणाऱ्या व्यक्तीला तसेच गरवंताला उत्तम फळ देते, अशीही श्रद्धा आहे.   

Advertisement

(नक्की वाचा: Akshaya Tritiya 2026 Wishes 25+: धन-धान्याची व्हावी समृद्धी, आरोग्य लाभो निरोगी; अक्षय्य तृतीयेनिमित्त पाठवा खास शुभेच्छा)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पितराना नैवेद्य कसा अर्पण करावा, याबाबत ज्योतिषी श्रीकेतन गुरुजींनी दिलेली माहिती जाणून घेऊया...

(वैशाख शु.3 | दिनांक 19 एप्रिल 2026 )
अक्षय तृतीया दिवशी उदक कुंभ दान हे पितरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
अक्षय कुंभ भरल्याने घरातील सुख, शांती आणि समृद्धी वाढते.
ही सेवा कोणीही करू शकतो आणि ब्राह्मणाला दान देऊ शकतो.

(नक्की वाचा: Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला केवळ धनाची नव्हे तर अष्टलक्ष्मी पूजा का करावी? लक्ष्मीमातेचे 8 दिव्य रुप आणि महत्त्व जाणून घ्या)

अक्षयतृतीया हा दिवस चार प्रमुख मुहूर्तांपैकी एक आहे.
या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही.
हा दिवस पितरांचा सण आहे.
म्हणून दुपारी 12 वाजेनंतर पितरांना अन्नाचा नैवेद्य करावा.
घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तुती म्हणावी.
केळीचे पूजन करताना खाली गहू ठेवावे.
पितरांसाठी उदककुंभदान करावे.

Photo Credit: NDTV Marathi

(नक्की वाचा: Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेची योग्य तारीख, तिथी, पूजा कधी करावी आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त जाणून घ्या)

उदक कुंभ विधी 
पत्रावळीवर तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मृत्तिका घट ठेवावा.
त्यात गंध, फुले, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा व पाणी घालावे.
घटास सूत्र वेष्टन करून पंचोपचार पूजा करावी.
नंतर तो ब्राह्मणास दान द्यावा.

Advertisement

गुरूजी श्रीकेतन कुलकर्णी यांची पोस्ट पूर्ण वाचा

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)