Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेची योग्य तारीख, तिथी, पूजा कधी करावी आणि सोने खरेदीचा मुहूर्त जाणून घ्या

Akshaya Tritiya 2026 Date And Shubh Muhurat: यंदा अक्षय्य तृतीया कधी आहे, पूजा कोणत्या मुहूर्तावर करावी आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त जाणून घ्या एका क्लिकवर...

जाहिरात
Read Time: 3 mins
Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी कधी करावे?
Canva

Akshaya Tritiya 2026 Date And Shubh Muhurat: अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण आहे. हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. यंदा 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. या शुभ दिवशी गणपती बाप्पा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. याच दिवशी परशुराम जयंतीही साजरी केली जाते. तसेच अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. चला जाणून घेऊया अक्षय्य तृतीयेची तिथी कालावधी, शुभ मुहूर्त तसेच कोणत्या मुहूर्तावर सोने खरेदी करावे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

अक्षय तृतीया 2026: तिथी आणि वेळ | अक्षय्य तृतीया 2026 | Akshaya Tritiya 2026 Tithi Time

  1. अक्षय तृतीया तिथी प्रारंभ: 19 एप्रिल 2026, सकाळी 10.49 वाजता | Akshaya Tritiya 2026 Tithi Start Time
  2. अक्षय तृतीया तिथी समाप्ती: 20 एप्रिल 2026, सकाळी 7.27 वाजता |Akshaya Tritiya 2026 Tithi End Time
  3. अक्षय तृतीया पूजा मुहूर्त: सकाळी 10.49 वाजेपासून ते दुपारी 12.20 वाजेपर्यंत आहे.| Akshaya Tritiya 2026 Puja Muhurat

सोने खरेदीसाठी शुभ वेळ | Akshaya Tritiya 2026 Shubh Muhurat For Gold 

संपूर्ण दिवस सोने खरेदीचा मुहूर्त: 19 एप्रिल 2026
सकाळी 10.49 वाजेपासून ते 20 एप्रिल 2026 पहाटे 5.51 वाजेपर्यंत आहे.

(नक्की वाचा: Akshaya Tritiya 2026 Wishes 25+: धन-धान्याची व्हावी समृद्धी, आरोग्य लाभो निरोगी; अक्षय्य तृतीयेनिमित्त पाठवा खास शुभेच्छा)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशीचे अन्य शुभ मुहूर्त | Akshaya Tritiya 2026 Shubh Muhurat

  1. सकाळचा मुहूर्त (चर, लाभ, अमृत): सकाळी 10.49 वाजेपासून ते दुपारी 12.20 वाजेपर्यंत आहे.
  2. दुपारचा मुहूर्त (शुभ): दुपारी 1.58 वाजेपासून ते दुपारी  3.35 वाजेपर्यंत आहे.
  3. संध्याकाळचा मुहूर्त (शुभ, अमृत, चर): संध्याकाळी 6.49 ते रात्री 10.57 वाजेपर्यंत आहे.
  4. रात्रीचा मुहूर्त (लाभ): 20 एप्रिल, उत्तररात्री 1.43 वाजेपासून ते पहाटे 3.05 वाजेपर्यंत आहे.
  5. पहाटेचा मुहूर्त (शुभ): 20 एप्रिल, पहाटे 4.28 वाजेपासून ते पहाटे 5.51 वाजेपर्यंत आहे.
अक्षय तृतीयेला सोने खरेदीचे महत्त्व | Akshaya Tritiya 2026 Significance 
  1. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. 
  2. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात धन, सुख-समृद्धी आणि सुख-शांती येते, अशी श्रद्धा आहे. 
  3. या दिवशी शुभ मुहूर्तावर खरेदी करणे महत्त्वाचे मानले जाते, कारण या काळात सकारात्मक आणि शुभ ऊर्जा अधिक प्रभावी असते.
  4. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे ही हिंदू धर्मातील एक जुनी आणि महत्त्वाची परंपरा आहे. 
  5. सोने खरेदीमुळे देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात प्रगती होते, असे म्हणतात. 
  6. सोन्याला केवळ धार्मिक महत्त्वच नाही, तर ते एक सुरक्षित गुंतवणूकही मानली जाते. हे दीर्घकाळात आर्थिक स्थिरता आणि वित्तीय सुरक्षा प्रदान करते.

(नक्की वाचा: Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला केवळ धनाची नव्हे तर अष्टलक्ष्मी पूजा का करावी? लक्ष्मीमातेचे 8 दिव्य रुप आणि महत्त्व जाणून घ्या)

राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी सांगितलेला उपाय

Photo Credit: NDTV Marathi

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)