Akshya Tritiya 2025 shubh yog : यावर्षी अक्षय्य तृतीया मंगळवारी म्हणजेच 30 एप्रिल रोजी आहे. या दिवशी तुम्ही कोणतंही शुभ काम मुहूर्त न पाहाता करु शकता. यावर्षीची अक्षय्य तृतीया अनेक गोष्टींसाठी खास आहे. कारण यंदा 24 वर्षांनी दुर्मीळ योग आलाय. यापूर्वी 2001 साली हा फायदा आला होता. या दुर्मीळ योगाचा फायदा 3 राशींना होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या राशींना होणार फायदा?
मेष : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अक्षय्य आणि गजकेसरी योग येत आहे. त्याचा फायदा मेष राशीच्या व्यक्तींना होणार आहे. त्यांना धन लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना नव्या संधी मिळू शकतात. तुम्हाला नवं काम सुरु करायचं असेल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. त्यामध्ये तुमच्या संपत्तीमध्ये वृद्धी होईल. देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपा कायम असेल.
( नक्की वाचा : Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला सोन्याऐवजी खरेदी करा या 5 गोष्टी, कसा होईल फायदा? वाचा यादी )
सिंह : या राशीच्या व्यक्तींवा अक्षय्य तृतीया एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. तुमची खोळंबलेली कामं पूर्ण होतील. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा खूप चांगला कालावधी आहे. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबात एखादं धार्मिक कार्य होऊ शकते. जुने मित्र आणि नातेवाईंच्या भेटीचा योग संभवतो. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल.
धनू : या राशीच्या व्यक्तींसाठी देखील अक्षय्य तृतीया अतिशय लाभदायक असेल. त्यांची बराच काळापासून त्रास देत असलेल्या आरोग्याच्या तक्रारीपासून सुटका होऊ शकते. कायदेशीर प्रकरणात तुमच्या बाजूनं निर्णय येऊ शकतो. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर होईल. घरात सुरु असलेला तणाव समाप्त होऊ शकतो. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या कामात जोडीदाराची पूर्ण साथ मिळू शकते.
(Disclaimer: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)