जाहिरात

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला सोन्याऐवजी खरेदी करा या 5 गोष्टी, कसा होईल फायदा? वाचा यादी

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शक्य नसल्यास तुम्ही घरामध्ये कोणत्या पाच गोष्टी विकत आणू शकता? याबाबत माहिती जाणून घेऊया...

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला सोन्याऐवजी खरेदी करा या 5 गोष्टी, कसा होईल फायदा? वाचा यादी
Akshaya Tritiya 2025: सोन्याऐवजी अक्षय्य तृतीयेला अन्य कोणत्या गोष्टी खरेदी कराव्या?

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी एखाद्या नव्या कामाचा शुभारंभ करणे फायदेशीर मानले जाते. तसेच अक्षय्य तृतीयेला सोन्याचे दागिने खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. पण सोने खरेदी करणे शक्य नसल्यास कोणत्या पाच गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता, ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील? याबाबत लेखाद्वारे सविस्तर माहिती जाणून घेऊया...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोन्याऐवजी अक्षय्य तृतीयेला कोणत्या गोष्टी खरेदी करू शकता?

  • आयुष्यात सुख-समृद्धी नांदावी, यासाठी मातीची भांडी खरेदी करू शकता. कवड्या, पिवळ्या रंगाची मोहरी, हळकुंड आणि कापूस देखील खरेदी करू शकता. 
  • अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या वस्तू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. 
  • कारण या पाचही गोष्टींचा कोणत्या-न्-कोणत्या ग्रहांशी संबंध आहे, असे म्हणतात.
  • हळकुंड खरेदी केल्यास तुमचा गुरू ग्रह मजबूत होण्यास मदत मिळेल. 
  • कापूस खरेदी केल्यास शुक्र ग्रह मजबूत होईल, शिवाय लक्ष्मीमातेची तुमच्यावर कृपादृष्टी कायम राहते. 
  • मातीची भांडी खरेदी केल्यास मंगळ ग्रह मजबूत होतो शिवाय कर्जातून मुक्तता मिळू शकते.  
  • पिवळ्या रंगाची मोहरी खरेदी केल्यास दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर होते. 
  • कवड्यांमुळे धन, संपत्ती आणि समृद्धी लाभते; असेही म्हणतात.

याव्यतिरिक्त अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आदि शंकराचार्यांनी रचलेल्या कनकधारा स्तोत्राचे पठण करावे, असे केल्यास अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ आणि फलदायी ठरू शकतो. 

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीया कधी आहे? लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

(नक्की वाचा: Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीया कधी आहे? लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत)

Happy Akshaya Tritiya 2025 Wishes: घरात नांदो आनंद, लाभो संपत्ती अपार; अक्षय्य तृतीयेच्या पाठवा खास शुभेच्छा

(नक्की वाचा: Happy Akshaya Tritiya 2025 Wishes: घरात नांदो आनंद, लाभो संपत्ती अपार; अक्षय्य तृतीयेच्या पाठवा खास शुभेच्छा)

अक्षय्य तृतीया 2025 शुभ मुहूर्त 

29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:31 वाजेपासून ते 30 एप्रिल दुपारी 2:12 वाजेपर्यंत अक्षय्य तृतीयेच्या तिथीचा काळ असणार आहे. म्हणजे अक्षय्य तृतीया यंदा 30 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. 

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने (Gold) खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे 5:31 वाजेपासून ते सकाळी 11:55 वाजेपर्यंत आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)