Expert Advice: दारूच्या एका पेगवर किती पाणी प्यावे? मद्यपानाचा हा नियम 99 टक्के मद्यपींना माहितच नाही

यामुळे पोटावर अल्कोहोलचा थेट परिणाम होत नाही आणि शरीर कमी प्रमाणात अल्कोहोल शोषते, ज्यामुळे त्याचे परिणाम कमी जाणवतात.

जाहिरात
Read Time: 2 mins

मद्यपान (Drinking Alcohol) करणे शरीरासाठी हानिकारक आहे  हे वगळे सांगण्याची गरज नाही. दारू पिऊ नये असं नेहमीच सांगितलं जातं. असं असलं तरी  भारत आणि जगभरात दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक लोक नियमितपणे मद्यपान करताना आपल्याला आढळतात. तर काही जण महिन्यातून एकदा दारू पितात. दारू पिणाऱ्यांमध्ये नेहमीच हा एक वादाचा विषय असतो की, 'दारूत किती पाणी टाकावे?' काही लोक दारू पिताना त्यात कोल्ड्रिंक किंवा सोडाही वापरतात. मात्र, वाईन तज्ज्ञांनी  दारू पिण्याचा एक महत्त्वाचा नियम सांगितला आहे. त्यात ते दारू घेतल्यानंतर किती पाणी प्यायला पाहीजे याचं गणीत त्यांनी सांगितलं आहे.  

प्रत्येक पेगनंतर पाणी का प्यावे?
वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड (Sonal Holland) यांच्या मते, अल्कोहोल शरीरात प्रवेश करताच ते रक्तात विरघळण्यास सुरुवात होते. त्यामुळे संबंधीत व्यक्तीला  नशा (Intoxication) येते. पण त्याचबरोबर, अल्कोहोल शरीराला डिहायड्रेट (Dehydrate) करण्यास सुरुवात करते. यामुळे अनेक समस्या येऊ शकतात. त्यामुळे शरीराला डिहायट्रेट करण्यापासून वाचवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे हे कधी ही चांगले असते. त्यामुळे दारू पिणाऱ्या व्यक्तींना जास्तीत जास्त पाणी पिण्यास सांगितले जाते. 

नक्की वाचा - बिअर कधी प्यावी, रात्री की सकाळी? बिअर पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? जाणून घेऊया

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, आपले शरीर ADH किंवा अँटी-ड्युरेटिक हार्मोन (Anti-diuretic hormone) नावाचा एक हार्मोन तयार करते असते. याचा थेट परिणाम हा  मूत्रपिंडांवर होतो. त्यामुळेच शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यास आणि कमी लघवी (Urine) तयार करण्यास सांगतो. पण जेव्हा आपण दारू पितो, तेव्हा अल्कोहोल हा हार्मोन ब्लॉक (Block) करण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे मूत्रपिंड उलट काम करते. ही एक प्रक्रीया आहे. त्यातून शरीरातील जास्तीत जास्त पाणी बाहेर टाकले जाते. परिणाम म्हणून दारू प्यायलेल्या व्यक्तीला वारंवार लघवी होते. याच परिणाम शरिरातील पाण्यावर होतो. त्याची पातळी ही कमी होते. 

नक्की वाचा - Guava Benefits: रोज एक पेरू खाण्याचे फायदे काय? 99 टक्के लोकांना माहितच नाहीत 'हे' जबरदस्त फायदे

तज्ज्ञ सांगतात की प्रत्येक पेगनंतर 1 ग्लास पाणी पिल्यास शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही आणि शरीर डिहायड्रेट होत नाही. मद्यपान करताना पाणी न पिल्यास त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी स्पष्ट दिसतो. ज्याला आपण हँगओव्हर (Hangover) म्हणतो. यामुळे डोकेदुखी, जास्त तहान लागणे आणि अशक्तपणा जाणवतो. अल्कोहोल पिण्यापूर्वी काहीतरी खाणे महत्त्वाचे आहे. शक्य नसेल तर दारू पिताना हलके-फुलके पदार्थ खावेत. यामुळे पोटावर अल्कोहोलचा थेट परिणाम होत नाही आणि शरीर कमी प्रमाणात अल्कोहोल शोषते, ज्यामुळे त्याचे परिणाम कमी जाणवतात.

Advertisement