जाहिरात

बिअर कधी प्यावी, रात्री की सकाळी? बिअर पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? जाणून घेऊया

आजकाल काही लोक कामाचा ताण किंवा थकवा दूर करण्यासाठी बिअर पितात. थंड बिअरमुळे तुम्हाला काही मिनिटांतच थकवा दूर झाल्याची आणि ऊर्जा मिळाल्याची भावना येते.

बिअर कधी प्यावी, रात्री की सकाळी? बिअर पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? जाणून घेऊया
बिअर कधी प्यावी

आजकाल काही लोक कामाचा ताण किंवा थकवा दूर करण्यासाठी बिअर पितात. थंड बिअरमुळे तुम्हाला काही मिनिटांतच थकवा दूर झाल्याची आणि ऊर्जा मिळाल्याची भावना येते. मात्र बिअर पिण्याची योग्य वेळ कोणती, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.  सकाळी की रात्री? हा मुद्दा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून, बिअरचा शरीरावर होणारा परिणाम वेळेनुसार बदलतो. म्हणून, सकाळी बिअर पिणे चांगले की रात्री हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळी बिअर पिणं योग्य? (Beer in the Morning) 

सकाळच्या वेळेत बिअर पिणं अजिबातच योग्य मानलं जात नाही. सकाळच्या वेळेत शरीर डिटॉक्स मोडमध्ये असतं आणि पचनक्रिया रिकाम्या पोटी सुरू होते. अशात दारू शरीरात जलद गतीने शोषूण घेतली जाते. ज्यामुळे नशा अधिक होऊ शकतो. रक्तातील साखर कमी होते. परिणामी दिवसभर सुस्ती, घेरी येणे किंवा थकवा जाणवतो. शिवाय, ही सवय हळूहळू व्यसनाधीनतेत विकसित होऊ शकते, जी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या हानिकारक आहे.
 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Pexels

रात्रीचं बिअर पिणं योग्य आहे का? (Beer at Night)

रात्रीच्या वेळी बिअर पिताना ती संतुलित आणि नियंत्रित प्रमाणात घेणे सोईचं ठरतं. यासोबतच, हलका आहार (Light Food) घेणे अधिक फायदेशीर आहे. हलक्या आहारासह बिअर प्यायल्यास, शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण एकाएकी वाढण्याऐवजी हळूहळू शोषले जाते. यामुळे, बिअरचा परिणाम सौम्य होतो आणि झोपेच्या गुणवत्तेवर कमी नकारात्मक परिणाम होतो.

कोणती वेळ योग्य? (What's the Best Time?)

आरोग्य तज्ज्ञांनुसार, बिअरसह कोणतीही दारू सकाळच्या वेळेत घेऊ नये. सकाळची वेळ योग्य नसते. जर कुणाला बिअर प्यायची असेल तर आठवड्यात मर्यादित प्रमाणात प्यायला हवी.  रात्री उशिरा मद्यपान न करता लवकर करणे देखील सुरक्षित मानले जाते. त्याचा झोपेवर कमी परिणाम होतो. शरीराला पचन करण्यास सोपं जातं. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी मद्यपान कमी प्रमाणात करावे आणि त्याचं व्यसन लावून घेऊ नये.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com