Hangover : दारू प्यायल्यानंतर हँगओव्हर का होतो? New Year Party पूर्वी या गोष्टी नक्की जाणून घ्या!

हँगओव्हरदरम्यान शरीरात नेमके काय घडतं? सर्वाधिक हँगओव्हर कधी होतो?

जाहिरात
Read Time: 2 mins
हँगओव्हर का होतो?

What is hangover? : दारूचा अतिरेक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डोकेदुखी, अस्वस्थता, डोकं गरगरणं, थकवा आणि चिडचिडेपणा सारखा त्रास होणं सर्वसाधारण बाब आहे. ज्याला हँगओव्हर म्हटलं जातं. पार्टीच्या सेलिब्रेशनदरम्यान अनेक जण प्रमाणापेक्षा जास्त दारू पितात. मात्र रात्री केलेली मजा-मस्ती सकाळी भारी पडते. दारूचा केवळ मेंदूवरच परिणाम होत नाही, तर मेटाबॉलिज्म, झोप, डिहायड्रेशन आणि हार्मोनल बॅलेन्स बिघडतो. याच कारणांमुळे दारूची नशा गेल्यानंतरही त्याचा हँगओव्हर दुसऱ्या दिवसापर्यंत कायम राहतो. 

हँगओव्हर काय असतो? 

अल्कोहोल शरीरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे हँगओव्हर. शरीर अल्कोहोलला एसॅटॅल्डिहाइड नावाच्या एका टॉक्सिक केमिकलमध्ये बदलतं. ज्यामुळे डोकेदुखी, जडत्व आणि अशक्तपणा जाणवतो. याशिवाय दारू प्यायल्यानंतर वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते. ज्यामुळे शरीरात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता निर्माण होते आणि यामुळेच डिहायड्रेशन, डोकेदुखी आणि थकवा अधिक वाढतो. 

दारू प्यायल्याने झोप लवकर येत असली तरीही ही गाढ झोप (डीप स्लीप) नसते, असं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे. ज्यामुळे सकाळी उठल्यानंतर उत्साही वाटत नाही. काही लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते. ज्यामुळे थरथरणे, अशक्तपणा आणि घेरी येण्यासारखी समस्या वाढते. 

Advertisement

नक्की वाचा - शरीरात अल्कोहोल किती काळ टिकतो? चाचणीत दारू किती काळापर्यंत आढळून येते? वाचा सविस्तर

सर्वाधिक हँगओव्हर कधी होतो?

हँगओव्हरदरम्यान शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. याशिवाय प्रखर दिवा, मोठा आवाज आल्यास चिडचिड होते. त्यातही रिकाम्या पोटी दारू प्यायल्याने जोखीम अधिक वाढते. यामुळे दारूचा परिणाम शरीरावर जलद गती होते. त्यामुळे डॉक्टर सांगतात, दारू पिताना मध्ये मध्ये पाणी प्या. दारू कमी प्रमाणात प्या. पुरेशी झोप आणि काहीतरी चांगलं खाल्ल्यानंतर दारू प्यावी. यामुळे दारूमुळे निर्माण होणारे दुष्परिणाम काही अंशी कमी होऊ शकतात. 

 (Disclaimer: मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)