- बिअर बिया होईची किंमत फक्त अठरा ते पाचवीस रुपयांमध्ये आहे, जी जगातील सर्वात स्वस्त मानली जाते
- बिया होई ही बिअर तांदळापासून बनवली जाते आणि तिच्यात अल्कोहोलचे प्रमाण फक्त दोन ते तीन टक्के असते
- व्हिएतनाम सरकार बिया होईवर कोणताही अतिरिक्त कर लावत नाही आणि ती ताजी बनवून त्वरित विकली जाते
नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वच जण सज्ज झाले आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वच जण पार्टीच्या तयारीला लागले आहे. या पार्टीत बिअर पिणाऱ्यांची संख्या मोठी असते. युरीपोयन कंट्री असो की अशियायी देश असो इथं बिअर पिणाऱ्यांची कमी नाही. ते बिअर पिताना मागे पुढे पाहत नाही. पण गेल्या काही काळात बिअरच्या किंमती वाढल्या आहेत. पण आता चिंता नको फक्त 18 ते 25 रुपयात तुम्हाला बिअर पिण्याचा आनंद घेता येणार आहे. नववर्षाच्या आधीच तळीरामांसाठी ही खुश खरबर म्हणाली लागेल. पण ही बिअर पिण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल याची कल्पना आहे का? याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
जगात अनेक देशांमध्ये मद्यावर मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो. मात्र व्हिएतनाममध्ये चित्र वेगळे आहे. व्हिएतनाममधील स्थानिक बिअर, जिला 'बिया होई' (Bia Hoi) म्हटले जाते, ती जगातील सर्वात स्वस्त बिअर मानली जाते. विशेष म्हणजे, या देशात पिण्याच्या पाण्याच्या बाटलीची किंमत साधारण 100 रुपये आहे. तर बिअरचा एक ग्लास अवघ्या 18 ते 25 रुपयांना मिळतो. त्यामुळे या देशात पाण्या पेक्षा ही बिअर स्वस्त आहे. इथं तुम्हाला फक्त 18 रुपयांत बिअर मिळते. ती ही तुमच्या पसंतीची असं सांगितलं जातं.
बिया होई' ही बिअर प्रामुख्याने तांदळापासून बनवली जाते. यात अल्कोहोलचे प्रमाण केवळ 2 ते 3 % इतकेच असते. ही बिअर बाटल्यांमध्ये पॅक न करता थेट पिंपातून (Barrels) विकली जाते हे त्याचे वैशिष्ट्य आहे. सरकार यावर कोणताही अतिरिक्त कर लावत नाही. शिवाय उत्पादन खर्च कमी असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत तिची किंमत अत्यंत कमी राहते. ही बिअर दररोज ताजी बनवून लगेच विकण्यावर भर दिला जातो. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना ही हीच बिअर आवडते. पर्यटक इथं आल्यानंतर त्यांची पहिली पसंती ही बिया होई बिअर असते.
एकूणच मद्याच्या किमतीचा विचार केल्यास कतार, आइसलँड आणि नॉर्वे यांसारख्या देशांमध्ये कडक निर्बंध आहेत. शिलाय या देशात बिअरवर मोठ्या प्रमाणात कर आहेत. त्यामुळे इथं बिअर महाग मिळते. कतारमध्ये एका पाइंटसाठी साधारण 930 ते 1100 रुपये मोजावे लागतात. याउलट व्हिएतनाम, मेक्सिको आणि जमैका यांसारख्या देशांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी मद्याचे दर कमी ठेवले आहेत. भारतात ही गोव्यात स्वस्त: बिअर मिळते. इथं ही मद्यावर अत्यल्प टॅक्स लावला जातो. त्यामुळे नववर्षात गोव्यात तळीरामांची मोठी गर्दी दिसून येते.