Amitabh Bachchan Health : अमिताभ बच्चन यांना कोण-कोणते आजार? 83 व्या वर्षीही भयानक आरोग्याच्या समस्या

महानायक अमिताभ बच्चन सध्या अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करीत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Amitabh Bachchan Health : महानायक अमिताभ बच्चन सध्या अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करीत आहे. नुकतच अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडियावर सर्जरीचा उल्लेख केला आहे. मात्र सर्जरी कशासंबंधित झाली याबाबत त्यांनी काहीच माहिती दिलेली नाही. या वृत्तानंतर बिग बींचे चाहते चिंतेत आहे. ८३ वर्षीय अमिताभ बच्चन आधीच अनेक आजारांचा सामना करीत आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक कोणकोणत्या आजारांचा सामना करीत आहेत?

अमिताभ बच्चन यांचे २५ टक्केच यकृत काम करतंय...

अनेकांना याबाबत माहीत आहे की, चित्रपट कुली (१९८२) च्या सेटवर त्यांचा गंभीर अपघात झाला होता. अभिनेता पुनीत इस्सरसह एका फाइट सीक्वेन्समध्ये अमिताभ बच्चनच्या पोटात गंभीर जखम झाली होती आणि खूप रक्तस्त्राव झाला होता. त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना क्लिनिकली डेड घोषित केलं होतं. मात्र बिग बी हरले नाही. त्यानंतर काही काळात अमिताभ बच्चन यांची प्रकृती सुधारली. 

Advertisement

या अपघातानंतर अमिताभ बच्चन यांच्या यकृतावर मोठा परिणाम झाला होता. ब्लड ट्रान्सफ्यूजनमुळे त्यांच्या शरीरात हेपेटायटिस-बी व्हायरस गेला होता. त्यामुळे त्यांचं ७५ टक्के यकृत डॅमेज झालं होतं. बिग बी केवळ २५ टक्के यकृतावर जिवंत आहेत, अशी माहिती आहे. २०१९ मध्ये त्यांनी स्वत: NDTV चा कार्यक्रम स्वस्थ इंडियामध्ये याचा खुलासा केला होता. बिग बी यांना हेपेटायटीस बी चा आजार झाला आहे.

नक्की वाचा - सलमान खानला कोणता आजार? महाभयंकर आजार काय आहे? अभिनेत्यानेच दिली होती धक्कादायक माहिती

बिग बींना अस्थमाचाही त्रास...

अमिताभ बच्चन यांना अस्थमासारखाही आजार आहे. एकदा त्यांना एका शूटदरम्यान इन्हेलरचा वापर करताना पाहिलं होतं. ते नेमकी स्वत:जवळ इन्हेलर ठेवतात. अनेकदा बिग बींना दम लागण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं.

स्पायनल टीबी...

अमिताभ बच्चन स्पायनल टीबी नावाच्या आजाराचाही सामना करीत असल्याची माहिती आहे. हा आजार मणक्यासंबंधित आहे. बराच काळ यावर उपचार घेतल्यानंतर ते बरे झाले. बिग बींना २००० साली त्यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या शोच्या पहिल्या सीझनचे चित्रीकरण करत असताना या आजाराबद्दल समजलं. त्यांनी २००३ साली केबीसीमध्ये स्वतः या आजाराचा उल्लेख केला.

मायस्थेनिया ग्रेविस...

अमिताभ बच्चन मायस्थेनिया ग्रेविस नावाच्या आजाराचाही सामना करीत होते. या आजारावरही त्यांनी मात केली. केबीसी १५ मध्ये अमिताभ बच्चन यांनी याबाबत सांगितलं होतं. हा आजार स्नायूसंबंधित आहे. यामध्ये छातीत आणि स्नायूंमध्ये तीव्र वेदना, तसेच बोलण्यात आणि श्वास घेण्यात अडचणी येतात.

Advertisement

डालर्टिक्युलाइटिस...

२०१८ मध्ये पोटातील तीव्र वेदनेमुळे बिग बी डॉक्टरांकडे पोहोचले, तेव्हा त्यांना डालर्टिक्युलाइटिस सारख्या गंभीर आजाराबाबत कळालं होतं. त्यांच्या आतड्यात हा त्रास होत होता. यानंतर बिग बी यांची सर्जरी करण्यात आली होती. एबीपी हिंदीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 


 


Topics mentioned in this article