Samsung कडून एआय बेस्ड R20 अल्ट्रासाऊंड सिस्टीम भारतात लॉन्च; आजाराचे अचूक निदान करणे होणार सोपे

R20 अल्ट्रासाऊंड सिस्टीमची रचना सॅमसंगच्या अत्याधुनिक 'क्रिस्टल आर्किटेक्चर'वर आधारित आहे. या सिस्टीममध्ये Advanced AI Tools, सुपरिअर इमेज क्लिअॅरिटी आणि अर्गोनॉमिक डिझाइनचा समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सॅमसंग कंपनीने जनरल इमेजिंगसाठी आपली सुपर-प्रीमियम आणि नेक्स्ट-जनरेशन R20 अल्ट्रासाऊंड सिस्टीम लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. सॅमसंग इंडियाचे एचएमई बिझनेसचे प्रमुख, अतांत्र दास गुप्ता  यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, "R20 हे इंटेलिजेंट  इनोव्हेशनद्वारे आरोग्य सेवेला पुढे नेण्याच्या सॅमसंगच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. एआय (AI) मध्यभागी ठेवून आणि इमेज उत्कृष्टतेवर व डॉक्टरांच्या सोयीवर लक्ष केंद्रित करून, R20 अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानात एक नवीन बदल घडवेल, ज्यामुळे डॉक्टरांना लाइव्ह स्कॅनिंगदरम्यानच घाव शोधण्यात मदत होईल."

AI टूल्समुळे निदान होईल अचूक

R20 अल्ट्रासाऊंड सिस्टीमची रचना सॅमसंगच्या अत्याधुनिक 'क्रिस्टल आर्किटेक्चर'वर आधारित आहे. या सिस्टीममध्ये Advanced AI Tools, सुपरिअर इमेज क्लिअॅरिटी आणि अर्गोनॉमिक डिझाइनचा समावेश आहे. ज्यामुळे डॉक्टरांना अभूतपूर्व व्हिज्युअलायझेशन आणि निदान करण्यात आत्मविश्वास मिळेल.

(नक्की वाचा-  AI Side Effects: धोक्याची घंटा! AI मुळे तरुणांमध्ये एकटेपणा वाढतोय)

R20 मध्ये अनेक AI-पॉवर बेस्ड क्लिनिकल आणि वर्कफ्लो एनहान्समेंट साधने आहेत, जी क्लिष्ट प्रक्रिया सुव्यवस्थित करतात. 

लाईव्ह लिव्हर असिस्ट (Live Liver Assist): लाइव्ह अल्ट्रासाऊंड स्कॅनदरम्यान यकृतावरील संशयास्पद घाव शोधते. 
लाईव्ह ब्रेस्ट असिस्ट (Live BreastAssist) : रिअल-टाईममध्ये BIRADS वर्गीकरण आणि रिपोर्टिंगसह स्तनांवरील घाव  शोधते.
ऑटो मेजरमेंट टूल्स (Auto measurement tools): AI आधारित  अंतर्गत संरचनेचे  स्वयंचलित शोध आणि मोजमाप करते.
Deep USFF: AI आधारित डीप अल्ट्रासाऊंड फॅट फ्रॅक्शन प्रमाणीकरण, जे MRI PDFF च्या गोल्ड स्टँडर्डशी जुळणारे आहे.

अनेक ॲप्लिकेशन्ससाठी उपयुक्त

R20 मध्ये एनहान्स डॉपलर सेन्सिटिव्हिटी आणि कलर फ्लो व्हिज्युअलायझेशन आहे. ज्यामुळे डॉक्टर सूक्ष्म रक्तवाहिन्या संरचना अधिक अचूकपणे तपासू शकतात. हे तंत्रज्ञान पोट, थायरॉईड, स्तन, प्रसूतीशास्त्र, स्त्रीरोग आणि मूत्रपिंड इमेजिंगसह अनेक क्लिनिकल ॲप्लिकेशन्समध्ये उत्तम कार्यप्रदर्शन करते.

Advertisement
Topics mentioned in this article