Angarki Sankashti Chaturthi 2024: अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये जय्यत तयारी केली जात आहे. यानिमित्त सोमवारी (24 जून) मध्यरात्री 1.30 वाजेपासून दर्शनाला सुरुवात केली जाईल. भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता मंदिर न्यास प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. नियोजनानुसार महिला आणि पुरुष भाविकांसाठी विशेष रांगा असतील. मंदिरात येताना भाविकांनी मौल्यवान वस्तू तसेच इलेक्ट्रॉनिक साहित्य आणू नये, असे आवाहनही मंदिर न्यासाने केले आहे. पावसामुळे भाविकांना त्रास होऊ नये, याकरिता मंदिर परिसरात मंडप उभारणी करण्यात आली आहे. अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार असाल तर आरतीची वेळ, दर्शनाच्या रांग इत्यादी सर्व नियोजनाची माहिती जाणून घ्या....
(नक्की वाचा: Vastu Tips: महालक्ष्मीचा आशीर्वाद हवाय? हे उपाय ठरतील फलदायी)
कसे असेल नियोजन?
श्री गणेशाचे दर्शन या वेळेमध्ये मिळणार
सोमवारी मध्यरात्री 1 वाजून 30 मिनिटांपासून ते पहाटे 3 वाजून 15 वाजेपर्यंत
पहाटे 3 वाजून 50 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत
दुपारी 12 वाजून 30 मिनिटांपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत
संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत
(नक्की वाचा: Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान)
आरतीच्या वेळा
सोमवारी रात्रीनंतर काकड आरती आणि महापूजा रात्रौ 12.10 वाजेपासून ते 1.30 वाजेपर्यंत
आरती : पहाटे 3.15 वाजेपासून ते 3.50 वाजेपर्यंत
नैवेद्य : दुपारी 12 वाजेपासून ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत
धुपारती : संध्याकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 7.10 वाजेपर्यंत
महापूजा नैवैद्य व आरती : रात्री 9 वाजेपासून ते रात्री 10.45 वाजेपर्यंत
चंद्रोदयाची वेळ : रात्री 10.28 वाजता
(नक्की वाचा: हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम)
आशीर्वचन रांग
रांगेची सुरुवात : सिद्धि प्रवेशद्वार येथील सुरक्षा भिंत साने गुरूजी उद्यान येथील मंडप मंदिर प्रवेशद्वार क्रमांक तीन
मंदिराबाहेर पडण्याचा मार्ग : रिद्धि प्रवेशद्वार मंदिर प्रवेशद्वार क्रमांक तीन
मुख दर्शनाची रांग
रांगेची सुरूवात : एस. के. बोले मार्ग आगर बाजार हरदेव कृपा दुकान सिद्धि प्रवेशद्वार मंदिर प्रवेशद्वार क्रमांक सात
मंदिराबाहेर पडण्याचा मार्ग : मंदिर प्रवेशद्वार क्रमांक एक सिद्धि प्रवेशद्वार (एस. के. बोले मार्ग)
गाभाऱ्यातील दर्शनासाठीची सर्वसामान्य रांग
रांगेची सुरुवात : रचना संसद कॉलेज मंदिर प्रवेशद्वार क्रमांक चार जय भारत हॉटेल राजे संभाजी मैदानातील मंडप गाभारा
मंदिराबाहेर पडण्याचा मार्ग रिद्धि प्रवेशद्वार (काकासाहेब गाडगीळ मार्ग) मंदिर प्रवेशद्वार क्रमांक तीन
गाभाऱ्यातील दर्शनासाठीची महिलांची रांग
रांगेची सुरुवात : रचना संसद कॉलेज, रिद्धि प्रवेशद्वार
प्रवेशद्वार जय भारत हॉटेल, राजे संभाजी मैदानातील मंडप प्रतीक्षालय इमारत प्रवेशद्वार क्रमांक सहा
मंदिराबाहेर पडण्याचा मार्ग : मंदिर प्रवेशद्वार क्रमांक तीन रिद्धि प्रवेशद्वार (काकासाहेब गाडगीळ मार्ग)