जाहिरात
Story ProgressBack

Vastu Tips: महालक्ष्मीचा आशीर्वाद हवाय? हे उपाय ठरतील फलदायी

Vastu Tips: ज्या घरामध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते, तेथे महालक्ष्मी नांदते; असे मानले जाते. महालक्ष्मीची कृपा- आशीर्वाद आपल्यावर कायम राहाव, अशी तुमची देखील इच्छा आहे का? तर मग जाणून घेऊया याकरिता कोणते उपाय करणे फलदायी ठरू शकतात.  

Read Time: 3 min
Vastu Tips: महालक्ष्मीचा आशीर्वाद हवाय? हे उपाय ठरतील फलदायी

Vastu Tips: महालक्ष्मी देवी (Goddess Lakshmi) धनसंपत्तीची देवता मानली जाते. महालक्ष्मी देवीचे घरामध्ये कोणत्या वेळेस आगमन होते, याबाबत शास्त्रांमध्ये महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे; असे जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच जेथे स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतली जाते, त्या घरामध्ये महालक्ष्मी देवी कायम निवास करते; असेही मानले जातात. महालक्ष्मी आईची कृपादृष्टी कायम राहावी, याकरिता भाविक विधीवत पूजा करतात. महालक्ष्मी देवीची कृपादृष्टी कायम राहावी, अशी तुमची देखील इच्छा आहे का? चला तर मग जाणून घेऊया लक्ष्मीमातेचे कोणत्या वेळेस घरामध्ये आगमन  (Time of Goddess Lakshmi coming in Home)  होते आणि देवीचा आपल्या घरामध्ये कायम निवास ( Lakshmi Vass in Home) राहावा? यासाठी नेमके काय करावे...

(नक्की वाचा: Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान)

महालक्ष्मी मातेचे या वेळेस घरामध्ये होते आगमन 

धार्मिक मान्यतांनुसार सायंकाळच्या वेळेस महालक्ष्मी मातेचे आपल्या घरामध्ये आगमन होते. 'लक्ष्मी येण्याची वेळ झाली...' हे वाक्य तुम्ही दिवे लागणीच्या वेळेस आई किंवा आजीकडून नक्कीच ऐकले असावे. संध्याकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान लक्ष्मीमातेचे आपल्या घरामध्ये आगमन होते, असे म्हटले जाते. यामुळेच संध्याकाळच्या वेळेस घरातील देवांसमोर, प्रवेश द्वारासमोर तसेच तुळशीच्या रोपासमोर दिवे लावण्याची परंपरा हिंदू धर्मामध्ये आहे. वास्तूशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर केर काढणे टाळावे, असेही सांगितले जाते. 

(नक्की वाचा: हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम)

प्रवेशद्वार उघडे ठेवावे

संध्याकाळच्या वेळेस घराचे मुख्य द्वार उघडे ठेवावे. प्रवेशद्वार बंद असेल तर महालक्ष्मी आल्या पाऊली परत जाते, असेही म्हणतात. त्यामुळे तिन्ही सांजेला घरातील मंदिर आणि मुख्य प्रवेशद्वारासमोर दिवा लावून लक्ष्मीमातेचे स्वागत करावे.  

(नक्की वाचा: प्रभू श्रीरामाच्या नावावरून तुमच्या मुलाचे ठेवा सुंदर आणि अर्थपूर्ण नाव)

घर स्वच्छ ठेवावे

ज्या घरामध्ये स्वच्छता असते, तेथे महालक्ष्मी मातेला राहणे पसंत असते; अशीही मान्यता आहे. त्यामुळे सूर्यास्तापूर्वी घरातील केर स्वच्छ करावा.  

महालक्ष्मी मातेची कृपादृष्टी कायम राहण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी

वास्तूशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. हे देवीदेवतांचे निवास करण्याचे स्थान आहे. घरातील मंदिर याच दिशेमध्ये असावे आणि या परिसराची नियमित स्वच्छता करावी. येथे कोणत्याही अनावश्यक वस्तू ठेवणे टाळावे. घराचा ईशान्य कोपरा कायम स्वच्छ असेल तर तेथे महालक्ष्मी माता आणि धनाची देवता कुबेर यांची कायम कृपादृष्टी तुमच्यावर राहील व त्यांचा निवास तुमच्या घरामध्ये कायम राहील. घरामध्ये सुख-समृद्धीही नांदेल. साफसफाई करताना घराच्या पूर्व दिशेचीही योग्य पद्धतीने स्वच्छता करावी. या दिशेने सूर्यप्रकाशासह घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

VIDEO: तापमानाचा पारा वाढला, नाशिककर घेत आहेत आयुर्वेदिक 'मडबाथ' चा आनंद 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination