Ashadhi Wari 2026: वारकरी संप्रदायात नित्यनेमाने 'हरिपाठ' का म्हटला जातो? जाणून घ्या यामागचा अर्थ आणि महत्त्व

Ashadhi Wari 2026: वारकरी संप्रदायात नित्यनेमाने 'हरिपाठ' का म्हटला जातो? संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या 28 अभंगांच्या या हरिपाठाचे महत्त्व, सर्वसमावेशकता आणि भगवंत प्राप्तीचा सोपा मार्ग जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Ashadhi Wari 2026: हरिपाठाचे महत्त्व माहितीये का?"
Canva

- प्रज्ञा कुलकर्णी, प्रतिनिधी

Ashadhi Wari 2026: वारकरी संप्रदायात (Varkari Sampradaya) भक्तीला आणि नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकरी पंथामध्ये दररोज नित्यनेमाने 'हरिपाठ' (Haripath) म्हणण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. राज्यातील कानाकोपऱ्यात दररोज संध्याकाळी वारकरी एकत्र येऊन हरिपाठाचे पठण करतात. पण ही परंपरा का सुरू झाली आणि हरिपाठाचे नेमके महत्त्व काय आहे? हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

28 अभंगांचा ठेवा

माऊली अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाची रचना केली आहे. या हरिपाठात एकूण 28 अभंग आहेत. सर्वसामान्यांनाही सहज समजेल अशा अत्यंत रसाळ आणि सोप्या मराठी भाषेत माऊलींनी याची रचना केली आहे. जीवनाचे खरे सार या 28 अभंगांमध्ये सामावलेले आहे.

Advertisement

(नक्की वाचा: Wari History: वारी म्हणजे काय? वारकरी नेमकं कोणाला म्हणतात? जाणून घ्या रंजक इतिहास)

कर्मकांडाला फाटा, केवळ 'हरी नामा'वर भर

ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी कोणत्याही कठीण तपश्चर्येची, कर्मकांडाची किंवा कठीण योगासनांची गरज नाही, हा विचार हरिपाठात प्रामुख्याने मांडला आहे. केवळ 'हरी नाम' घेण्याचा आणि देवाचे नामस्मरण करण्याचा अत्यंत सोपा मार्ग यात सांगितला आहे. 'हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी॥' या ओळींमधून माऊलींनी भगवंताशी एकरूप होण्याचा, मुक्ती मिळवण्याचा साधा आणि सरळ संदेश दिला आहे.

(नक्की वाचा: Ashadhi Wari: वारीच्या वाटेवर टाळ अन् घुंगरूचा संगम! गेल्या 32 वर्षापासून लावणी अन् वारकऱ्याची अनोखी परंपरा)

Ashadhi Wari2025 | Haripath | वारकरी रोज हरिपाठ का म्हणतात?

सर्वसमावेशकता आणि अहंकाराचा त्याग

हरिपाठाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची 'सर्वसमावेशकता'. यात जात, पात, धर्म किंवा लिंग असा कोणताही भेद मानलेला नाही. भगवंताच्या नामस्मरणाचा आणि भक्तीचा अधिकार समाजातील प्रत्येक घटकाला आहे, हे हरिपाठ सांगतो. जर खऱ्या अर्थाने भगवंताची प्राप्ती करायची असेल, तर मानवाने आधी आपल्यातील अहंकाराचा त्याग केला पाहिजे. आपला अहंकार सोडून भगवंताला पूर्णपणे शरण जाणे, हाच हरिपाठाचा मुख्य गाभा आहे. याच निस्सीम श्रद्धेने वारकरी संप्रदायात दररोज हरिपाठाचे वाचन केले जाते.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)