माकडं कशाला घाबरतात? त्यांना पळवून लावायचं असेल तर ही खास ट्रिक लगेच वापरा

अनेक लोक पुदिन्याचे तेल (Peppermint Oil) पाण्यात मिसळून फवारतात. याच्या तीव्र वासामुळेही माकडे जवळपास थांबत नाहीत.

जाहिरात
Read Time: 2 mins

माकडांचा सामना करणे सोपे नसते. कारण ते खूर हुशार असतात शिवाय खोडकर ही असतात. अनेक घरांमध्ये माकडे छतावर फिरतात, रोपांचे नुकसान करतात आणि अगदी स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतात. अशा परिस्थितीत माकडांना घरापासून दूर ठेवण्यासाठी नेमका कोणता उपाय करावा, असा प्रश्न अनेकदा पडतो. माकडांना कोणती गोष्ट आवडत नाही, कोणत्या वासाने ती दूर पळतात आणि त्यांच्या वारंवार येण्यामागील संकेत काय आहेत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

माकडे तीव्र आणि तिखट वासांपासून दूर राहतात. विशेषतः लिंबू, व्हिनेगर (सिरका), लसूण आणि अमोनिया यांसारखे वास त्यांना अजिबात आवडत नाहीत. माकडांना दुर ठेवण्यासाठी तुम्ही लिंबाचं साल किंवा व्हिनेगरचे मिश्रण बाल्कनी आणि खिडक्यांजवळ स्प्रे करू शकता. किंवा कापूर जाळून त्याचा सुगंध पसरवणे हा देखील प्रभावी उपाय आहे. अनेक लोक पुदिन्याचे तेल (Peppermint Oil) पाण्यात मिसळून फवारतात. याच्या तीव्र वासामुळेही माकडे जवळपास थांबत नाहीत.

नक्की वाचा - Dhurandhar: 'धुरंधर' चा पाकिस्तानने घेतला धसका! बॉलिवूडला प्रत्युत्तर देण्यासाठी उचललं मोठं पाऊल

माकडे कशापासून घाबरतात?
माकडे अचानक होणारे आवाज आणि जलद हालचाली (Sudden Movement) यांपासून घाबरतात. पत्र्याचे डबे, स्टीलच्या प्लेट्स किंवा अलार्मसारखे आवाज त्यांना एकदम घाबरवून सोडतात. पतंग उडवण्यासाठी वापरली जाणारी चमकदार टेप किंवा वाऱ्याने हलणाऱ्या वस्तू माकडांना दूर ठेवतात. काही ठिकाणी रबराचे नकली साप ठेवले जातात, कारण साप पाहून माकडे लगेच सावध होतात आणि दूर जातात.

माकडांना घरापासून दूर ठेवण्याचे प्रभावी मार्ग
माकडांना दूर ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना खाण्याचे कोणतेही कारण देऊ नका. घराच्या खिडक्या उघड्या ठेवू नका आणि फळे-भाजीपाला उघड्यावर ठेवू नका. छतावर कचरा किंवा उरलेले अन्न अजिबात सोडू नका. बाल्कनीमध्ये मोशन-सेन्सर (Motion-Sensor) असलेले दिवे किंवा फिरणारे पंखे लावणे उपयुक्त ठरते. रोपांजवळ लिंबू आणि व्हिनेगरचा स्प्रे वापरणे देखील प्रभावी ठरते. माकडांना पाण्यासाठी भांडी ठेवणे किंवा त्यांना खाऊ घालण्याची सवय लावू नका, कारण त्यामुळे ती रोज परत येतात.

Advertisement

माकडांच्या आगमनाचा अर्थ
लोकमान्यतेनुसार, माकडांचे घरी येणे हे हनुमानाचे संकेत मानले जाते. मात्र, वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा अर्थ असा आहे की, तुमच्या आसपास झाडे-वनस्पती आणि अन्नाचे स्रोत उपलब्ध आहेत. जर माकडांना येथे सुरक्षितता आणि अन्न मिळेल, तर ती वारंवार परत येत राहतात. त्यामुळे घर आणि आजूबाजूला स्वच्छता राखणे आणि त्यांना अन्न न देणे हे महत्त्वाचे आहे.