कावासाकी आपली लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक 'निन्जा 500' भारतात बंद करू शकते, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णपणे पूर्णविराम देत इंडिया कावासाकी मोटर्सने (Kawasaki Motors) आपले अपडेटेड मॉडेल '2026 Kawasaki Ninja 500' भारतीय बाजारपेठेत उतरवले आहे. ही नवी बाईक आता अधिक पर्यावरणपूरक इंधन पर्याय आणि कंपनीच्या सिग्नेचर स्पोर्टी लुकसह ग्राहकांच्या भेटीला आली आहे.
E20 इंधन आणि नवा 'लाइम ग्रीन' अवतार
नवीन 2026 कावासाकी निन्जा 500 मध्ये दोन सर्वात मोठे आणि मुख्य बदल पाहायला मिळतात.
E20 फ्युएल कंपॅटिबिलिटी: ही बाईक आता 20 टक्के एथेनॉल मिश्रित पेट्रोलवर (E20 Fuel) धावू शकते.
सिग्नेचर लाइम ग्रीन कलर: कंपनीने या बाईकला आपला सर्वात लोकप्रिय आणि आक्रमक दिसणारा 'Lime Green' रंग दिला आहे, जो या बाईकला ट्रॅकवरील रेसिंग बाईकसारखा ग्रँड लुक देतो.
(नक्की वाचा- Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू)
रंग आणि इंधन अपग्रेड व्यतिरिक्त बाईकचा मूळ शार्प डिझाईन पॅटर्न तसाच ठेवण्यात आला आहे. यात आधीसारखेच ट्वीन एलईडी हेडलाइट्स, मस्कुलर फ्यूल टँक आणि फुल-फेयरिंग डिझाइन पाहायला मिळते.
इंजिन आणि पॉवरफुल परफॉर्मन्स
ताकदीच्या बाबतीत, 2026 मॉडेलमध्ये कोणताही यांत्रिक बदल करण्यात आलेला नाही. 451cc, लिक्विड-कूल्ड, पॅरेलल-ट्विन इंजिन 45 hp ची मॅक्सिमम पॉवर आहे. इंजिन 42.6 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन असिस्ट अँड स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
अॅडव्हान्स फीचर्सची जोड
स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी : बाईकमध्ये डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, जे कावासाकीच्या 'Rideology' अॅपद्वारे ब्लूटूथने स्मार्टफोनशी कनेक्ट होते.
सिक्युरिटी : दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकसह डुअल-चॅनल एबीएस (Dual-Channel ABS) सिस्टीम मिळते.
इतर सुविधा: फुल एलईडी लाइटिंग सेटअप आणि प्रवासादरम्यान मोबाईल चार्ज करण्यासाठी एक उपयुक्त यूएसबी चार्जिंग पोर्ट (USB Port) देखील समाविष्ट आहे.
(नक्की वाचा- School Time: राज्यातील शाळांची वेळ बदलणार? ॲक्टिव्ह टीचर्स फोरमने शिक्षणमंत्र्यांकडे काय केली मागणी?)
भारतात किती असेल किंमत?
2026 Kawasaki Ninja 500 ची भारतातील एक्स-शोरूम किंमत 5.76 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत जुन्या मॉडेलपेक्षा साधारण 10,000 रुपयांनी जास्त आहे. ही बाईक भारतात 'सीबीयू' म्हणजेच पूर्णपणे परदेशातून आयात करून विकली जात असल्यामुळे यावर जास्त कर आकारला जातो. परिणामी याची किंमत थोडी प्रीमियम आहे. भारतात या बाईकची थेट स्पर्धा एप्रिलिया आरएस 457 (Aprilia RS 457) या बाईकशी असेल.