हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम

Hanuman Chalisa Path: हनुमानभक्त नियमित स्वरुपात हनुमान चालीसाचे पठण करतात. तुम्ही देखील यांपैकीच एक आहात तर काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा...

जाहिरात
Read Time: 2 mins
Hanuman Jayanti: हनुमान चालीसाचे या दिवशी पठण करणे का मानले जाते शुभ?

Hanuman Jayanti 2024: प्रभू श्रीरामाचे सर्वात मोठे भक्त म्हणून ओळखले जाणारे संकटमोचन हनुमानजींची देखील घराघरांमध्ये पूजा केली जाते. शक्ती आणि बुद्धीचा आशीर्वाद देणारे बजरंगबली संकटांमध्ये भक्तांचे रक्षण करतात. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करून भक्तगण हनुमानजींची मनोभावे पूजा करतात. मंगळवार आणि शनिवार असे दोन दिवस हनुमान चालीसाचे पठण करणे अधिक शुभ व लाभदायी मानले जाते. पण काही भाविक नियमित स्वरुपात हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) पठण करतात.

(नक्की वाचा: प्रभू श्रीरामाच्या नावावरून तुमच्या मुलाचे ठेवा सुंदर आणि अर्थपूर्ण नाव)

कारण जीवनातील अडथळे-संकट दूर होण्यास मदत मिळते आणि साधक भयमुक्त होतात, असे म्हणतात. यासह भाविकांवर बजरंगबलीची (Bajrangbali) कृपादृष्टी कायम राहते. इतकेच नव्हे तर हनुमान चालीसाचे पठण करणाऱ्या भाविकांवर प्रभू श्रीराम आणि भगवान शिव, माता पार्वतीचीही कृपा होण्यास मदत मिळते. पण ही कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी, यासाठी हनुमान चालीसा पठण करताना काही खास नियमांचे पालन करावे लागते,हे तुम्हाला माहिती आहेत का? तुम्ही देखील नियमित स्वरुपात हनुमान चालीसा पठण करत असाल तर या चुका करणे टाळा.

(नक्की वाचा: Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त)

हनुमान चालीसाचे पठण करताना टाळा या चुका 

  • हनुमान चालीसाचे पठण करताना मन शुद्ध आणि मनामध्ये कोणत्याही शंका असता कामा नये.  
  • कोणत्याही प्रकारची नकारात्मकता मनामध्ये आणू नये. मनामध्ये भक्ती आणि सकारात्मकता ठेवून पठण केल्यास शुभ फळ मिळतील. 
  • हनुमानजी नेहमीच दुर्बल व्यक्तींच्या पाठीशी असतात. त्यामुळे जे लोक दुर्बल लोकांना विनाकारण त्रास देतात, त्यांच्यावर हनुमानजींची कृपा कधीच होत नाही.  
  • आपण हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर कमकुवत लोकांना त्रास देणे आणि अपशब्दांचा वापर करणं टाळावे. 
  • हनुमान चालीसाचे पठण करताना कोणत्याही व्यक्तीशी बोलणे टाळावे.  
  • परमेश्वरावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करून मनापासून पठण करावे, अन्यथा त्याचे शुभ फळ मिळणार नाही.

या दिवशी पठण केल्यास मिळतील दुपट्ट लाभ 

  • मंगळवारी पहाटेच्या सुमारास हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) पठण करावे. कारण हा दिवस हनुमानजींसाठी अतिशय खास असतो आणि या दिवशी तीन वेळा पठण केल्यास भाविकांना शुभ फळ मिळतात, असे मानले जाते. 
  • याव्यतिरिक्त शनिवारी देखील हनुमान चालीसाचे पठण करून हनुमानजींची पूजा करावी. यामुळे भक्तांवर हनुमानाची कृपादृष्टी कायम राहिलच शिवाय शनिदेवाचा कोप होण्यापासून रक्षण होईल, असे म्हणतात.
  • ज्या लोकांवर शनीचा कोप होत आहे किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीचे स्थान कमकुवत आहे, अशा लोकांनी शनिवारी हनुमान चालीसाचे पठण केल्यास लाभ मिळू शकतील.

(नक्की वाचा: श्रीरामापासून प्रत्येकानंच शिकल्या पाहिजेत 'या' 5 गोष्टी)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. 

Topics mentioned in this article