Sheesham Benefits For Women: निसर्गाने आपल्याला अशी काही झाडे आणि वनस्पती दिल्या आहेत, ज्यामध्ये औषधी गुणधर्मांचा मोठा साठा आहे. शिसवी हे झाड त्यापैकीच एक आहे. शिसवी झाडाचे लाकूड सामान्यतः फर्निचर तयार करण्यासाठी वापरले जाते. पण या झाडाचे आरोग्यवर्धक फायदे तुम्हाला माहिती आहेत का? विशेषतः महिलांसाठी हे झाड अमृतासमान आहे. शिसवीची साल, पाने आणि बियांमध्ये असे गुणधर्म आहेत जे शरीर आतील बाजूने स्वच्छ करतात, हार्मोन्स पातळी संतुलित करण्यास मदत करतात आणि महिलांशी संबंधित आजारांपासूनही सुटका मिळू शकते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुळापासून पानांपर्यंत, देठ आणि बिया देखील फायदेशीर
शिसवी झाड मुळापासून ते पान, देठ आणि त्याचे लाकूड देखील उपयोगी आहे. शिसवीचे लाकूड आणि बियांपासून काढले जाणारे तेल गुणकारी असते. शिसवीच्या बियांचे तेल त्वचा विकारांसाठी फायदेशीर असते आणि लाकडाच्या पावडरचा फेसपॅक म्हणून वापर केला जाते. कुष्ठरोगासह अन्य त्वचा विकारांसाठीही हे झाड लाभदायक मानले जाते.
महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायक
शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलित पातळीमुळे महिलांना मासिक पाळीदरम्यान वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो, उदाहरणार्थ मूड बदलणे, चिडचिडेपणा, थकवा येणे यासारख्या समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांवर शिसवी फायदेशीर ठरू शकते. शिसवीचा काढा किंवा पानांचा अर्क प्यायल्यास मासिक पाळीदरम्यान पोटात येणारे पेटके, पोटदुखी, अति रक्तस्त्रावाच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. शिसवीच्या पानांचा रस देखील अतिशय फायदेशीर ठरू शकतो. महिलांच्या स्तनांना सूज येत असेल तर औषधोपचारामध्ये शिसवीचा वापर करू शकता.
(नक्की वाचा: How To Drink Water: पाणी ग्लासऐवजी लोट्याने का प्यावे? पोट-आतड्यांवर काय होतील परिणाम, जाणून घ्या)
त्वचा आणि केसांची समस्या
बहुतांश महिला मुरुम, डाग, रॅशेज यासारख्या त्वचेशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त असतात. शिसवीचे तेल आणि या झाडाच्या पानांच्या रसामुळे या समस्यांपासून सुटका मिळू शकते. त्वचेशी संबंधित संसर्ग कमी होऊ शकतो. केसांचा कोरडेपणा, केस गळणे, कोंडा किंवा पांढऱ्या केसांची समस्याही कमी होऊ शकते. शिसवीचे तेल किंवा पानांच्या रसामुळे केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल आणि केस मुळासकट मजबूत होतील.
लघवीशी संबंधित समस्या
याव्यतिरिक्त थांबून-थांबून लघवी होणे किंवा लघवी करताना जळजळ होणे यासारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते. शिसवीच्या पानांचा काढा प्यायल्यास लघवीशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात. रक्ताभिसरण प्रक्रिया देखील सुधारते.
(नक्की वाचा: Belly Fat Loss Diet: सुटलेले पोट होईल सपाट, नियमित केवळ या इवल्याशा दोन गोष्टींचे करा सेवन)
पोटाचे आरोग्य
शिसवीच्या पानांचा रस प्यायल्यास पोटामध्ये होणारी जळजळ कमी होईल आणि पचनशक्ती देखील सुधारेल.
अँटी-बॅक्टेरिअल
शिसवीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराचा संसर्गपासून बचाव होण्यास मदत मिळते. शारीरिक जखमा भरुन काढण्यासाठी शिसवीचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त पानांची पेस्ट करुन सांध्यावर लावल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.
यासह नियमित स्वरुपात याचे सेवन केल्यास गॅस, अपचन आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. शिसवीच्या पानांचा रस प्यायल्यास तोंडाचे आरोग्य सुधारते. तोंडाला येणारा दुर्गंध किंवा दात-हिरड्यांची समस्या कमी होऊ शकते. शिसवीची पाने चावून खाणेही फायदेशी ठरू शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )