जाहिरात

Belly Fat Loss Diet: सुटलेले पोट होईल सपाट, नियमित केवळ या इवल्याशा दोन गोष्टींचे करा सेवन

How to reduce Belly Fat: पोटावर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी डाएटमध्ये काही बदल केले तर हळूहळू पोट सपाट होण्यास नक्कीच मदत मिळेल.

Belly Fat Loss Diet: सुटलेले पोट होईल सपाट, नियमित केवळ या इवल्याशा दोन गोष्टींचे करा सेवन
How to loose belly fat : सुटलेले पोट कमी करण्यासाठी डाएट

How To Reduce Belly Fat: बदलत्या लाइफस्टाइलमुळे हल्ली बहुतांश लोक लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करत आहेत. लोक प्रामुख्याने सुटलेल्या पोटामुळे बरेच चिंतेत असतात. कारण पोटाच्या भागावर वाढलेली चरबी कमी करणे सोपे नसते. सुटलेल्या पोटामुळे संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो. शिवाय वाढल्या वजनामुळे अनेक गंभीर आजारांना निमंत्रण मिळते. व्यायाम आणि डाएटच्या मदतीने पोटावरील चरबी कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकते. डाएटमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा जेणेकरून पोटावरची चरबी लगेचच कमी होईल, याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डाएटच्या मदतीने सुटलेले पोट कसे होईल कमी? (How to reduce Belly Fat with the help of diet)

बदाम

डाएटमध्ये बदामाचा समावेश केल्यास बेली फॅट कमी होण्यास मदत मिळू शकते. बदामामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, अँटी-ऑक्सिडंट्स, झिंक, मॅग्नेशिअमसह कित्येक खनिजांचा साठा आहे. ही पोषणतत्त्व आरोग्यासाठी आवश्यक आहेत. कारण यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. बदामातील प्रोटीन आणि फायबरमुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही आणि शरीराची चयापचयाची क्षमता वाढण्यास मदत मिळते. रोज सकाळी भिजवलेले दोन बदाम खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

(नक्की वाचा: Weight Loss Tips: Baba Ramdev यांनी सांगितले रोज 1 kg वजन घटवण्याचा रामबाण उपाय, पोट होईल एकदम सपाट)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

अंजीर

अंजीर देखील आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळतील. अंजीरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, यामुळे फॅट्स बर्न होण्यास मदत मिळेल. पण अंजीरमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असल्याने याचे मर्यादित स्वरुपातच सेवन करावे, अन्यथा वजन आणखी वाढेल. अंजीरमध्ये कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस हे गुणधर्म आहेत. हा पोषणतत्त्वांमुळे शरीराची पचनप्रक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.  

(नक्की वाचा: Weight Loss Diet: पटापट वजन कमी करण्यासाठी या पिठाचे करा सेवन, डाएटिशियनने सांगितली योग्य पद्धत)

Latest and Breaking News on NDTV

सुकामेव्यामुळे वजन कमी होण्यास मदत कशी मिळते?

  • सुकामेव्यामुळे शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता भरुन निघण्यास मदत मिळते. 
  • सुकामेव्यातील पोषणतत्त्वांमुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही.
  • सुकामेव्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने चयापचयाची क्षमता सुधारते, यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com