जाहिरात

Bank Holiday: कृपया लक्ष द्या! ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँका बंद; कधी- कधी सुट्टी? RBIचे कॅलेडर लगेच पाहा

ऑगस्ट महिन्यात देशभरातील बँका एकूण 14 दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.  

Bank Holiday: कृपया लक्ष द्या! ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँका बंद; कधी- कधी सुट्टी? RBIचे कॅलेडर लगेच पाहा

Bank Holidays in August 2026: ऑगस्ट महिन्यात बँकेची कामे करु इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये विविध सण, जयंती, विविध राज्यातील स्थानिक उत्सवांमुळे बँका मोठ्या प्रमाणात बंद राहणार आहेत. ऑगस्ट महिन्यात  देशभरातील बँका एकूण 14 दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.  या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये सारख्या नसून, काही सुट्ट्या विशिष्ट राज्ये आणि शहरांपुरत्याच मर्यादित आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या शहरातील बँक सुट्ट्यांची माहिती तपासूनच शाखेला भेट द्यावी.

1st August Rule Change: LPG, रेल्वे तिकीट ते बँका.. 1 ऑगस्टपासून 5 नियम बदलणार; तुमच्या खिशाचा ताण वाढणार?

ऑगस्ट २०२६ मध्ये बँका केव्हा बंद राहतील? | August Bank Holiday List 

  • २ ऑगस्ट (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
  • ८ ऑगस्ट (दुसरा शनिवार) – देशभरातील बँका बंद
  • ९ ऑगस्ट (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
  • १३ ऑगस्ट – मणिपूरमध्ये देशभक्त दिन
  • १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) – देशभरातील बँका बंद
  • १६ ऑगस्ट (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
  • २२ ऑगस्ट (चौथा शनिवार) – देशभरातील बँका बंद
  • २३ ऑगस्ट (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
  • २५ ऑगस्ट – ईद-ए-मिलाद
  • २८ ऑगस्ट – रक्षाबंधन
  • ३० ऑगस्ट (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

याव्यतिरिक्त, काही राज्यांमध्ये स्थानिक सण आणि प्रादेशिक कार्यक्रमांमुळे बँका बंद राहू शकतात. त्यामुळे, बँकेत जाण्यापूर्वी आपल्या राज्याच्या सुट्ट्यांची यादी नक्की तपासा.

बँका बंद असताना कोणत्या सेवा सुरू राहतील?

बँकेच्या शाखा बंद असल्या तरी, ग्राहकांना डिजिटल बँकिंग सेवा मिळत राहतील. यामध्ये UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ATM मधून रोख रक्कम काढणे आणि IMPS यांसारख्या सेवांचा समावेश आहे. जर तुम्हाला शाखेत चेक जमा करायचा असेल, ड्राफ्ट काढायचा असेल, तुमचे KYC अपडेट करायचे असेल किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल, तर सुट्ट्यांच्या आधीच नियोजन करा. यामुळे तुम्हाला बँक बंद असण्याचा सामना करावा लागणार नाही.

Maharashtra Rain: सावधान! राज्यात पावसाचा हाय अलर्ट, 31 जिल्ह्यांना झोडपणार; कुठे कुठे बरसणार?

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com