मोबाईल गरम झाला तरी फोनवर बोलत आहात का तर सावधान! कशी घ्याल उन्हाळ्यात मोबाईलची काळजी

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रातिनिधीक फोटो

अन्न, वस्त्र, निवारा या तीन गोष्टींनंतर आता मोबाईल ही देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट अनेकांच्या आयुष्यात झाली आहे. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एकही मिनिट अनेकांना मोबाईलचा विरह सहन होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या उष्णतेमुळे मोबाईल बंद झाला तर अनेक कामं खोळंबून राहू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरासारखीच मोबाईलची काळजीही घेणं आवश्यक आहे. तुमचे काम करण्याचे ठिकाण नक्की नसेल तर उन्हाळ्यात घराबाहेर पडल्यानंतर मोबाईलची काळजी कशी घ्यावी? हे पाहूया

एप्रिल आणि मे महिन्यांत उष्णतेची लाट तीव्र असते. या उष्णतेमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू अचानक बंद पडतात. महागडे मोबाईलही काम करताना अचानक बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत.  असलेल्या कॉंप्रेसरवर उष्णतेाचा भार येतो आणि ते बंद पडतात. अशी माहिती विक्रत्यांनी दिली. 

मोबाईल गरम झाला झाला तर... सध्या बहुतेकांकडं स्मार्ट फोन असतो. या फोनमध्ये अनेक अनेक अॅप आहेत. या अॅप मधून निरनिराळे काम सुरू असते. हे काम सुरु असतानाच फोन आला तर आपण फोनवर बोलताना मोबाईल अधिक तापतो. मोबाईल हाताला गरम वाटला तर त्वरीत बोलणं थांबवा असा सल्ला विक्रेत्यांनी दिला. कारण, गरम झालेल्या मोबाईलवर बोलत बसलो तर शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. इतकेच नव्हे तर बॅटरीचा स्फोट होऊ शकतो आणि कानाला दुखापत होऊ शकते. 


 हेड फोन वापरा

मोबाईलवर बोलताना अधिक वायर असणा-या हेड फोन्सचा वापर करणे आवश्यक आहे. यामुळे मोबाईल कमीत कमी वेळ हातात घेतला जाईल. मोबाईल गरम होत असल्याने ब्ल्यू टूथ वापरणे टाळले पाहिजे. मोबाईल गरम होत आहे असे वाटल्यास थोड्यावेळ बंद करून ठेवावा. मोबाईल गरम होत आहे असे जाणवले तर त्वरीत तो 10 ते 15 मिनिट बंद करून ठेवावा. त्यामुळे काम करताना अचानक मोबाईल बंद होणार नाही. अनेक महागड्या फोनला हाय हिटचे संकेत देण्यात येतात. हे संकेत दिल्यानंतरही फोनवर काम करणे हे जीवाला आणि मोबाईलला घातक ठरू शकते.

कव्हर घालावे आणि...

पावसाळ्यात आपण मोबईलला पाणी लागू नये यासाठी कव्हर घालतो. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात देखील त्यांना कव्हर घालणे खूप गरजेचे आहे. यामुळे मोबाईलचा सुर्य किरणांशी थेट संपर्क येत नाही. याचबरोबर मोबाईल कुल करावा. यासाठी 5 ते 7 मिनिटासाठी मोबाईल एसी किंवा कुलर समोर धरून ठेवावा.

Advertisement
Topics mentioned in this article