Fastest Hair Growth Oil: लांबसडक, घनदाट आणि मजबूत केस मिळवण्यासाठी महिलावर्ग कित्येक उपाय करतात. पण धकाधकीच्या जीवनामध्ये प्रदूषण आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे केसांचे गळणे सुरू होते, केसांची वाढही थांबते. केसांना नैसर्गिकरित्या पोषणतत्त्वांचा पुरवठा होण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे तेल मसाज. बाजारात इतक्या प्रकारचे तेल उपलब्ध असताना नेमके कोणते तेल वापरल्यास केसांची झटपट वाढ होईल, यावरुन तुमचाही गोंधळ उडतो का? चिंता करू नका, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
केसांच्या वाढीच्या प्रक्रियेमध्ये तेल कसे काम करते? | How Oils Helps In Hair Growth
टाळूच्या आरोग्यावर केसांची वाढ अवलंबून असते. जेव्हा तुम्ही तेलाने टाळूचा मसाज करता तेव्हा टाळूच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते, यामुळे केसांच्या मुळांपर्यंत पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. तेलामुळे टाळूला मॉइश्चरायझर मिळते, कोंडा- त्वचेशी संबंधित संसर्ग दूर होतात, तेलातील जीवनसत्त्वे, फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे केसांचे तुटणे कमी होऊन केसांची वाढ जलदगतीने होते.
केसांची पटकन वाढ होण्यासाठी कोणते तेल वापरावे? | List Of Fastest Hair Growth Oils
1. रोजमेरी एसेंशिअल ऑइल (Rosemary Essential Oil): गेल्या काही वर्षांपासून हे तेल प्रचंड चर्चेत आहे. संशोधनातील माहितीनुसार, रोजमेरी तेल केसांच्या वाढीमध्ये मिनोक्सिडिल यासारख्या औषधाइतकेच प्रभावी ठरू शकते. यामुळे टाळूच्या भागातील रक्तप्रवाह सुधारतो. नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये हे तेल मिक्स करून वापरावे.
2. एरंडेल तेल (Castor Oil): एरंडेल तेलामध्ये ओमेगा-6 फॅटी अॅसिड आणि रिसिनोलेइक अॅसिडचे (Ricinoleic Acid) प्रमाण जास्त असते. या तेलाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास केस जाड आणि घनदाट होण्यास मदत मिळते. नारळाचे तेल किंवा बदामाच्या तेलामध्ये एरंडेल तेल मिक्स करून वापरावे म्हणजे केस जास्त चिकट होणार नाहीत.
3. नारळाचे तेल (Coconut Oil): नारळाच्या तेलामध्ये लॉरिक अॅसिड असते, ज्यामुळे केसांचे जास्त प्रमाणात नुकसान होत नाही. केसांची वाढही चांगली होते.
4. आवळ्याचे तेल (Amla Oil): आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे टाळूची त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. या तेलातील पोषणतत्त्वांमुळे केस मुळासकट मजबूत होतात.
केसांमध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी तेलाचे योग्य मिश्रण
केसांच्या निरोगी आरोग्यासाठी केवळ एकाच तेलावर अवलंबून राहण्याऐवजी या तेलांचा वापर करून पाहा...
ग्रोथ बूस्टर मिक्स: 100 मिलि नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये 10 मिलि एरंडेल तेलात 10-12 थेंब रोजमेरी असेंशिअल ऑइल मिक्स करा आणि टाळूचा मसाज करा.
आयुर्वेदिक मिश्रण: नारळाच्या तेल आवळा, भृंगराज यासारख्या औषधी वनस्पतींसह गरम करा. या तेलाने हेडमसाज करावा.
(नक्की वाचा: Winter Health Tips: हिवाळ्यात 30 दिवस रिकाम्या पोटी गाजर, बीट आवळ्याचा ज्युस प्यायल्यास कोणते आजार ठीक होतील?)
तुमच्या केसांचा प्रकार आणि स्कॅल्पच्या आवश्यकतेनुसार तेलाचा वापर करावा. रोजमेरी ऑइल, एरंडेल तेल, नारळाचे तेल आणि आवळ्याचे तेल सर्वाधिक प्रभावी पर्याय आहेत. कमीत कमी 30 मिनिटे तेल केसांवर लावा आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांवर तेल लावा. योग्य तेल, पौष्टिक आहार आणि तणावमुक्त लाइफस्टाइल फॉलो केल्यास केस लांबसडक होतील.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)