Aloe Vera Benefits For Hair: त्वचा आणि केसांशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी अॅलोव्हेराचे रोप हे रामबाण उपाय आहे. पण केसांवर थेट अॅलोव्हेरा लावावे का? यावरुन बहुतांश महिलांचा गोंधळ उडतो. केसांवर अॅलोव्हेरा कसे लावावे, हे तुम्हालाही कळत नाहीय का? तर चिंता करू नका, तुम्ही थेट केसांवर अॅलोव्हेरा लावू शकता. अॅलोव्हेरामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन B12 यामुळे केसांच्या मुळांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. केसांचा कोरडेपणा दूर होते आणि स्कॅल्पची त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. तुम्ही केसगळती, कोंडा आणि केस तुटणे या समस्यांमुळे त्रस्त आहात का? तर ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता नाही. याऐवजी तुम्ही ब्युटी रुटीनमध्ये अॅलोव्हेराचा समावेश करू शकता.
अॅलोव्हेरा केसांवर कसे लावावे? (How to Apply Aloe Vera On Hair)
- सर्वप्रथम अॅलोव्हेराचे एक ताजे पान काढा आणि ते मधोमध कापा.
- आतील गर मिक्समध्ये वाटून काढा आणि त्याची पेस्ट तयार करा.
- पेस्ट केसांवर लावा आणि बोटांच्या मदतीने केसांवर लावा. यानंतर हलक्या हाताने केसांचा मसाज करावा.
- केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकापर्यंत अॅलोव्हेरा पेस्ट लावा.
- 30 ते 45 मिनिटे अॅलोव्हेरा जेल केसांमध्ये राहू द्यावे, यामुळे केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल.
- सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या आणि केसांना कंडिशनj लावा.
- आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.
(नक्की वाचा: Avocado Benefits For Skin: रोज एक अॅव्होकाडो खाल्ल्यास त्वचेवर कोणते परिणाम होतात?)
केसांना अॅलोव्हेरा लावण्याचे फायदे (Benefits of Aloe Vera for Hair)
- केसगळती कमी होते: अॅलोव्हेरामध्ये प्रोटियॉलिटिक एंझाइम्सचा समावेश असतो, ज्यामुळे कोरड्या केसांची समस्या दूर होते. केसांची वाढ होते आणि केसगळतीची समस्याही कमी होते.
- कोंड्याची समस्या : अॅलोव्हेरामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत, यामुळे कोंडा आणि स्कॅल्पला येणारी खाज कमी होण्यास मदत मिळेल.
- नैसर्गिक कंडिशनर : अॅलोव्हेरामधील मॉइश्चराइजिंग एजेंट्समुळे केसांना ओलावा मिळतो, यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.
- स्कॅल्पला थंडावा मिळतो : अॅलोव्हेरा जेलमुळे स्कॅल्पला थंडावा मिळेल.
(नक्की वाचा: Fast Hair Growth Oil: केसांची होईल भराभर वाढ, घरच्या घरी तयार करा हे तेल; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप माहिती)
अॅलोव्हेरा हेअरमास्क (Different Combinations of Aloe Vera for Hair)
1. अॅलोव्हेरा + नारळ तेल : एक चमचा नारळाच्या तेलामध्ये दोन चमचे अॅलोव्हेरा जेल मिक्स करुन स्कॅल्पवर लावा. या हेअरमास्कमुळे केसांवर चमक येईल.
2. अॅलोव्हेरा + कांद्याचा रस : अर्ध्या कांद्याचा रस आणि दोन चमचे अॅलोव्हेरा जेल केसांवर लावल्यास केसांची वाढ होईल. कांद्यामध्ये सल्फर असते, जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असते.
3. अॅलोव्हेरा + दही: केस कोरडे झाले असतील तर दही आणि अॅलोव्हेरा एकत्रित करून लावा. केस मऊ होतील.
4. अॅलोव्हेरा + मेथी पावडर : कोंडा आणि केसगळतीच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास अॅलोव्हेरा-मेथी पावडर एकत्रित करा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )