Belly Button Lint: बेंबीमध्ये कापूस किंवा घाण कशाप्रकारे तयार होते, हे अनेकांना कोडं वाटत असते. आता कॅनेडियन असोसिएशन जर्नल आणि ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून यामागील 'विज्ञान' उलगडले आहे. बेंबीतील ही समस्या मुख्यतः शरीरशास्त्र आणि कपड्यांशी संबंधित असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
कॅनेडियन असोसिएशन जर्नलमध्ये छापलेल्या माहितीनुसार, बेंबीतील कापूस म्हणजे घाण कपड्यांवरील फायबर/तंतू, मृत त्वचेच्या पेशी (Dead Skin Cells), शरीरावरील केस या तिन्ही घटकांच्या मिश्रणातून तयार होते.
केसांची भूमिका सर्वात महत्त्वाची
ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. कार्ल क्रुझेल निकी यांनी या विषयावर सखोल संशोधन केले आहे. त्यांना त्यांच्या या कामासाठी 2002 आयजी नोबेल पुरस्काराने (Ig Nobel Prize) सन्मानित करण्यात आले होते.
क्रुझेल निकी आणि कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये छापलेल्या माहितीनुसार, बेंबीभोवतीचे केस हे एकाच दिशेने काम करणाऱ्या 'यंत्रासारखे' काम करतात. कपड्यांवरील धाग्यांमधून लहान लहान तंतू हे केस बेंबीत गोळा करतात, ज्यामुळे ही घाण तयार होते.
पाहा- VIDEO
(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
डॉ. क्रुझेल निकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी लोकांकडून नमुने गोळा केले आणि त्यांना त्यांच्या बेंबीभोवतीचे केस कापण्यास सांगितले. केस कापल्यानंतर त्यांच्या बेंबीत कपड्यांच्या तंतूसारखी घाण साठणे थांबले असल्याचे दिसून आले. यामुळे बेंबीतील कापूस तयार होण्यात केसांची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचे सिद्ध झाले.
कोणाला होतो अधिक त्रास?
संशोधकांच्या निष्कर्षानुसार, बेंबीत कापूस तयार होण्याचा त्रास वजनदार आणि केस जास्त असलेले पुरुष, अंगावर अधिक लव मध्यम वयीन पुरूषांना आहे. कपड्यांमधून अधिक तंतू बाहेर पडत असतील, तर हा त्रास अधिक होतो.
बेंबीतील घाण हानिकारक नाही, पण कधीकधी अडचण निर्माण करते. त्यामुळे दररोज अंघोळ करताना बेंबीची स्वच्छता करणे आणि कपड्यांची निवड काळजीपूर्वक करणे हाच यावरील सोपा आणि प्रभावी उपाय आहे.
रंगाचे कोडं कायम
या कापसाच्या रंगाबाबतचे कोडं मात्र अजूनही काहीसे कायम आहे. काहींना या कापसाचा रंग निळा दिसतो, यामागील नेमके कारण काय आहे, यावर अधिक संशोधनाची गरज आहे.