Benefits of Cold Water Bath : अंघोळ गरम पाण्याने करावी की थंड पाण्याने हा नेमहीचाच चर्चेचा विषय आहे. अनेकांना सकाळी उठल्यावर गरम पाण्याने अंघोळ करायला आवडते, कारण ते आराम देतं. पण, शरीराला जर आव्हाने पेलण्यासाठी सक्षम बनवायचे असेल, तर 'थंड पाण्याची अंघोळ' हा एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी यांनी थंड पाण्याचे वैज्ञानिक फायदे सांगताना, ही सवय कशी अंगीकारावी याबद्दल मार्गदर्शन केले आहे.
थंड पाण्याचे 8 आश्चर्यकारक फायदे
- रक्ताभिसरण - थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्यांचे आकुंचन-प्रसरण होते, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि ऊर्जा मिळते.
- त्वचा व केस - गरम पाण्यामुळे येणारा कोरडेपणा (Dryness) कमी होतो, त्वचा फ्रेश राहते.
- थकवा निवारण - स्नायूंची सूज (Inflammation) कमी होऊन वर्कआउटनंतरची रिकव्हरी जलद होते.
- सतर्कता - थंड पाण्याचा स्पर्श शरीराचा 'रिफ्लेक्स' सक्रिय करतो, ज्यामुळे झोप उडते आणि मन जागृत होते.
- तणाव व्यवस्थापन- हा एक प्रकारचा 'नियंत्रित ताण' (Controlled Stress) आहे, ज्यामुळे मन शांत राहण्यास शिकते.
- ऊर्जा नियमन- शरीराचे तापमान राखण्यासाठी शरीर अधिक कार्यक्षमतेने ऊर्जा वापरते.
- शिस्त आणि सातत्य- रोज कम्फर्ट झोनच्या बाहेर पडल्याने मानसिक शिस्त वाढते.
- बॉडी क्लॉक - नियमित सवयीमुळे शरीराचे जैविक घड्याळ (Body Clock) संतुलित राहण्यास मदत होते.
(नक्की वाचा- Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)
थंड पाण्याची अंघोळ : साधी सवय, पण शरीराला जुळवून घेणं शिकवणारी
— Dr Ravindra L. Kulkarni MD (@KulkarniRL) April 23, 2026
पहिल्या काही सेकंदात अस्वस्थ वाटतं…
पण हाच छोटा बदल शरीराला adapt (जुळवून घेणं) शिकवतो
1️⃣ रक्ताभिसरण सुधारतं
थंड पाणी लागल्यावर रक्तवाहिन्या आकुंचन- सैल होतात → रक्तप्रवाह सुधारतो → उर्जा जाणवते
2️⃣ त्वचा आणि…
या व्यक्तींनी सावधानता बाळगावी!
डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे की, जरी ही सवय फायदेशीर असली तरी काही लोकांसाठी ती धोकादायक ठरू शकते. नुकताच हार्ट अटॅक आला असल्यास किंवा हृदयाचे गंभीर आजार असल्यास थंड पाणी टाळावे. अनियंत्रित रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी अचानक थंड पाण्याखाली जाऊ नये. अतिशय अशक्त वृद्ध व्यक्ती किंवा तीव्र आजार असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(नक्की वाचा- Manoj Jarange: "वेळ गेलेली नाही,...", लग्नाळू तरुणांची लग्न होणार; मनोज जरांगेंचा मोलाचा सल्ला ऐका!)
कशी करावी सुरुवात?
अचानक बर्फासारख्या थंड पाण्याने अंघोळ करू नका. सुरुवातीला कोमट पाण्याने सुरुवात करून शेवटची काही सेकंद थंड पाणी वापरा. हळूहळू वेळ वाढवत शरीराला याची सवय होऊ द्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world