Soaked Raisins Benefits: मनुके केवळ चवीलाच छान असतात असे नाही तर ते शरीरासाठीही फायदेशीर आहेत. नुकतेच फोर्टिस वसंत कुंज येथील 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. वत्स्य यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये डॉ. वत्स्य यांनी रोज पाच ते सहा भिजवलेले मनुके खाण्याचा सल्ला दिला आहे. भिजवलेल्या मनुक्यांचे सेवन कोणत्या लोकांनी करावे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
येथे पाहा व्हिडीओ...
भिजवलेले मनुके खाण्याचे फायदे | Benefits Of Eating Soaked Raisins
डॉ. वत्स्य यांच्या माहितीनुसार, आजकाल बहुतांश लोक पोटाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही डाएटमध्ये भिजवलेल्या मनुकांचा समावेश केल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात, जसे की...
जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर मनुका हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये आढळणारे फायबर आणि सॉरबिटॉल हे घटक मल मऊ करण्यास तसेच पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. मनुका आतड्यांमधील पाण्याचे संतुलन राखण्यासही मदत करतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
(नक्की वाचा: Jaggery Benefits: जेवणानंतर एक छोटा तुकडा गूळ खाल्ल्याने काय होते? आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले मोठे सीक्रेट)
मनुके हृदयासाठी चांगले आहेत का?
डॉक्टरांच्या मते मनुकांमध्ये आढळणारे पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स हृदयासाठी चांगले मानले जातात. जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही मनुकांचे सेवन करू शकता.
मनुका खाल्याने मूळव्याधाची समस्या (पाइल्स) ठीक होते का?
होय, डॉ. शुभम यांच्या मते भिजवलेल्या मनुका खाल्याने मूळव्याध म्हणजेच पाइल्सच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो.
(नक्की वाचा: Soaked Anjeer: सलग 30 दिवस मी रिकाम्यापोटी अंजीर खाल्लं, तरुणीने सांगितलं छोट्या फळाने तिचे आयुष्य कसं बदललं?)
एका दिवसात किती भिजवलेले मनुक खाल्ले पाहिजे?
दररोज रात्री पाच ते सहा मनुके पाण्यात भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे सेवन करा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)