cuddling म्हणजे आपल्या पार्टनरच्या कुशीत झोपणं केवळ रोमँटिंग अनुभव नाही तर हे तुमचं शरीर आणि मन दोघांसाठी फायदेशीर आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला जवळ घेऊन झोपता, त्यावेळी केवळ प्रेम वाढत नाही तर स्ट्रेस कमी होतो आणि गाढ झोप येते. याशिवाय तुमचं नातं मजबूत होतं.
अनेक अभ्यासानुसार, पार्टनरला मिठी मारून झोपल्यामुळे शरीरात ऑक्सीटोसिन नावाचं प्रेम संप्रेरक किंवा लव्ह हार्मोन वाढतं, ज्यामुळे मूड चांगला राहतो. हृदयचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे पार्टनरला जवळ घेऊन झोपणं केवळ प्रेम दर्शवित नाही तर हेल्दी आणि आनंदी नात्याचं सिक्रेट आहे.
पार्टनरच्या कुशील झोपण्याचे फायदे (Amazing Benefits Of Sleeping While Cuddling With Your Partner)
ताण कमी करते (Reduces Stress)
जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिठी मारून झोपता तेव्हा तुमचे शरीर ऑक्सिटोसिन सोडतं, ज्याला प्रेम संप्रेरक देखील म्हटलं जातं. या संप्रेरकामुळे मूड सुधारतो. तणाव आणि चिंता कमी होते.
झोपेची गुणवत्ता सुधारते (Improves Sleep Quality)
तुमच्या जोडीदाराच्या शरीरातील ऊब आणि हृदयाचे ठोके यामुळे तुम्हाला आरामदायी झोप मिळते. एकत्र झोपणाऱ्या जोडप्यांना अविवाहितांपेक्षा चांगली झोप येते.
नाते मजबूत (Strengthens Relationship)
पार्टनरला कुशील घेऊन झोपल्याने भावनिक बंध आणि विश्वास मजबूत होतो. जेव्हा तुम्ही दररोज रात्री एकमेकांना मिठी मारून झोपता तेव्हा तुमच्यातील प्रेम आणि समजूतदारपणा दोन्ही अधिक दृढ होतो.
रक्तदाब नियंत्रित करते (Controls Blood Pressure)
ऑक्सिटोसिन केवळ मूडवरच नाही तर शरीरावर देखील परिणाम करतं. यामुळे तुमचा रक्तदाब नॉर्मल राहतो. आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
पार्टनरचा स्पर्श आणि त्याच्या शरीराची उब तुमचं मन शांत करतं. त्यामुळे एकटेपणा वाटत नाही. तणावापासूनही दूर राहता.
इम्यूनिटी वाढते (Boosts Immunity)मिठी मारल्यामुळे जो ऑक्सीटोसिन रिलीज होतो त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते. यामुळे आजारांशी लढा देणं सोपं जातं.
Photo Credit: ians
शरीराचं तापमान संतुलित राखतं (Balances Body Temperature)त्वचेच्या स्पर्शाने शरीराचं तापमान संतुलित राहतं. यामुळे चांगली झोप मिळते. विशेषत: थंडीत मिठी मारून झोपणे अत्यंत सुखद आणि आरोग्यदायी मानलं जातं.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.