Astrology Tips: वाहन खरेदी हा केवळ एक व्यवहार नसून, तो आपल्या कुटुंबाच्या सुख, प्रगती, समृद्धी आणि सुरक्षित प्रवासाचा प्रारंभ मानला जातो. भारतीय संस्कृतीनुसार, कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात शुभ मुहूर्तावर केल्यास त्याचे सकारात्मक फळ मिळते. शास्त्रानुसार योग्य तिथी, वार आणि नक्षत्राचा विचार करून घेतलेले वाहन दीर्घकाळ लाभ देते आणि प्रवासात सुरक्षितता प्रदान करते. अश्विनी, पुष्य आणि रोहिणी यांसारखी नक्षत्रे तसेच गुरुवार किंवा शुक्रवार यासारखे शुभ वार वाहन खरेदीसाठी अत्यंत फलदायी मानले जातात. योग्य मुहूर्तासोबतच देवाचे पूजन आणि सकारात्मक संकल्प जोडला की, ते वाहन आपल्या प्रगतीचा मार्ग अधिक वेगवान करते. याबाबत ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णी यांनी दिलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया...
वाहन खरेदीसाठी शुभ नक्षत्र
खालील नक्षत्रे वाहन खरेदीस अत्यंत शुभ मानली जातात
1. अश्विनी – नवीन कार्याची जलद आणि यशस्वी सुरुवात
2. रोहिणी – स्थैर्य आणि सुख
3. मृगशीर्ष – प्रवास व व्यापारासाठी लाभदायक
4. पुष्य – सर्वश्रेष्ठ, सर्वकार्य सिद्धी
5. हस्त – कौशल्य आणि सुरक्षितता
6. चित्रा – वैभव व आकर्षण
7. अनुराधा – यश आणि सहकार्य
8. श्रवण – दीर्घकाळ उपयोग
9. रेवती – सुरक्षित प्रवास, शुभ फल
कोणता वार चांगला?
सोमवार – मानसिक शांतता, कौटुंबिक सुख
बुधवार – व्यापार, कागदपत्रे, व्यवहारासाठी उत्तम
गुरुवार – सर्वश्रेष्ठ, दीर्घकाळ लाभ
शुक्रवार – वैभव, सुखसोयी वाढतात
या दिवशई वाहन खरेदी करणं टाळावे, कारण?
मंगळवार - अपघात आणि वाद टाळण्यासाठी
शनिवार - वारंवार दुरुस्ती टाळण्यासाठी
शक्यतो टाळावा, पण योग्य मुहूर्त असेल तर घेतले जाऊ शकते.
या तिथीच्या दिवशी वाहन खरेदी करणं टाळावे
- अमावस्या
- कृष्ण पक्ष चतुर्थी, नवमी, चतुर्दशी
- भद्रा काल
- राहुकाल
- पुष्य नक्षत्र + गुरुवार – अत्यंत मंगलकारक
- अक्षय तृतीया
- विजयादशमी
- गुढीपाडवा
- वाहन क्रमांक आपल्या जन्मतारीखेशी जुळणारा असावा.
- जीवनपथ अंकाशी सुसंगत अंक आल्यास आर्थिक आणि मानसिक लाभ होतो.
गाडी घेतल्यावर काय करावे?
1. प्रथम श्रीगणेश पूजन करावे.
2. लिंबू-मिरची बांधावी (नजर दोष टाळण्यासाठी).
3. मंदिरात नेऊन नारळ फोडावा.
4. शक्य असल्यास हनुमान चालीसा पठण करावे.
आध्यात्मिक दृष्टिकोन
वाहन हे केवळ साधन नाही; ते आपल्या कर्माचा वेग वाढवते. म्हणून वाहन घेताना मन शुद्ध, संकल्प पवित्र आणि ईश्वर स्मरण आवश्यक आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)