Better Sleep Tips: रात्री अंथरुणात पडल्या पडल्या झोप येणारे लोक हल्ली फारच कमी प्रमाणात आढळतील. धकाधकीच्या जीवनामध्ये रात्री गाढ आणि शांत झोप न मिळण्याची समस्या सामान्य झालीय. कधी-कधी तास-न्-तास अंथरुणात पडून राहिल्यानंतरही झोप येत नाही. डोक्यामध्ये विचार सुरू राहतात. तुम्ही देखील या समस्येचा सामना करताय का? तर जादुई ट्रिक्स फॉलो करा. यास मिलिटरी पद्धत असेही म्हणतात.
अमेरिकेमध्ये सैनिकांना कठीण परिस्थितीतही लवकर झोपी जाण्यासाठीही प्रशिक्षण दिले जाते. या टिप्सचा वापर केल्यास 96 टक्के लोकांना केवळ दोन मिनिटांत झोप लागते, असा दावाही करण्यात आलाय. तुम्हाला देखील गाढ आणि शांत झोप हवी असेल तर हे तीन उपाय फॉलो करा.
दोन मिनिटांत गाढ आणि शांत झोप कशी येईल?
चेहऱ्याचा भाग शिथिल करा
बिछान्यावर झोपल्यानंतर चेहऱ्याचे सर्व स्नायू सैल सोडा. जीभ, जबडा आणि डोळ्यांच्या आसपासचे स्नायू पूर्णपणे शिथील करा. पूर्णपणे तणावमुक्त व्हा.
खांदे आणि हात सैल सोडा
आता खांदे पूर्णपणे सैल सोडून खालील बाजूस झुकवा. यानंतर दोन्ही हात देखील खाली ठेवा. या प्रक्रियेदरम्यान शांतपणे श्वास घेत राहा.
पायांना आराम द्या
खांदे, हातांनंतर आता पायाचा भागही शिथिल ठेवा. मांड्या, पोटऱ्या सैल सोडा. शरीराचा एक-एक अवयव सैल सोडून द्या. यानंतर शरीराची हालचाल करू नका.
(नक्की वाचा: Better Sleep Tips: रात्रभर कुस बदलत राहता, झोप येत नाही? या अवयवांवर दाब द्या, शांत आणि गाढ झोप लगेचच येईल)
मेंदूतील विचार थांबवा- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दहा सेकंदांसाठी मेंदूमध्ये कोणतेही विचार आणू नये. चिंता करणं थांबवा आणि मन पूर्णपणे शांत ठेवा.
- तज्ज्ञांच्या माहितीनुसार तुम्ही सहा आठवडे ही टिप्स फॉलो केल्यास तुमच्या शरीराला सवय होईल आणि दोन मिनिटांत तुम्हाला झोप येईल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)