Bhai Dooj 2025 Shubh Muhurat: भाऊबीज सण म्हणजे भाऊबहिणीच्या प्रेमाचे, विश्वासाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करते. यंदा 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज सण आहे. कोणत्या मुहूर्तावर भाऊबीज साजरी करावी? औक्षणाच्या थाळीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा? सर्व गोष्टींची माहिती जाणून घेऊया...
यंदा भाऊबीज 2025 कधी आहे? | Bhai Dooj 2025 Date And Time | Bhaubeej 2025 Kadhi Ahe? | When Is Bhai Dooj 2025 Date
यंदा भाऊबीज 23 ऑक्टोबर 2025 (गुरुवार) रोजी आहे.
भाऊबीज 2025 तिथी | Bhai Dooj 2025 Tithi | Kartik Dwitiya Tithi Start And End Time
- कार्तिक शुद्ध द्वितीय तिथी प्रारंभ वेळ (Kartik Dwitiya Tithi Begins) : 22 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 08:16 वाजता
- कार्तिक शुद्ध द्वितीय तिथी समाप्त वेळ (Kartik Dwitiya Tithi Ends) : 23 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10:46 वाजता
गुरूजी कौस्तुभ जोशी यांनी सांगितला शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्त्व, ऐका संपूर्ण व्हिडीओ
सिंह लग्न मुहूर्त म्हणजे काय? कधी आहे हा मुहूर्त?
भाऊबीज 2025 शुभ मुहूर्त | Bhai Dooj 2025 Tika Time | Bhaubeej 2025 Ovalanicha Shubh Muhurat | Bhai Dooj 2025 Tika Shubh Muhurat
23 ऑक्टोबर 2025 रोजी गुरुवारी दुपारी 01 वाजून 32 मिनिटांपासून ते दुपारी 03 वाजून 51 मिनिटांपर्यंत वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. या कालावधीदरम्यान भाऊबीज साजरी करू शकता.
- अभिजीत मुहूर्त (Bhai Dooj 2025 Abhijeet Muhurat) सकाळी 11.59 वाजेपासून ते दुपारी 12.46 वाजेपर्यंत आहे.
- विजय मुहूर्त (Bhai Dooj 2025 Vijay Muhurat) दुपारी 2.18 वाजेपासून ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत आहे.
- निशिता मुहूर्त (Bhai Dooj 2025 Nishita Muhurat) रात्री 11.50 वाजेपासून ते उत्तररात्री 12.48 (AM) (24 ऑक्टोबर) वाजेपर्यंत आहे.
(नक्की वाचा: Bhai Dooj 2025 Shubh Muhurat: भाऊबीज सणाची तिथी आणि भावाला टिळा लावण्यासाठीचा सर्वोत्तम शुभ मुहूर्त जाणून घ्या)
भाऊबीजेच्या ओवाळणीचे ताट कसे तयार करावे? | Bhai Dooj 2025 Pooja Thali
- सर्वप्रथम पूजेची थाळी स्वच्छ धुऊन घ्यावी.
- थाळी गोल आकाराची असावी.
- त्यावर हळद-कुंकूच्या मदतीने स्वस्तिक चिन्ह काढावे.
- थाळीच्या मधोमध दिवा ठेवावा. दिव्याच्या चारही बाजूंना पूजा सामग्री म्हणजे श्रीफळ, हळद-कुंकूचा करंडा, फुले, मिठाई, विडा, सुपारी, अक्षता ठेवावे.
- औक्षणाच्या थाळीमध्ये भाऊबहिणीच्या दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करणाऱ्या वस्तू ठेवाव्या.
(नक्की वाचा: Happy Bhai Dooj 2025 Wishes: भाऊबहिणीच्या प्रेमाच्या अतूट नात्याचा सण, भाऊबीजनिमित्त दादाताईला पाठवा खास शुभेच्छा)
भाऊबीज पूजा सामग्रीचे महत्त्व | Bhai Dooj 2025 Pooja Samagri| | Bhai Dooj 2025 Puja Samagri
- भावाच्या कपाळावर लावले जाणारे कुंकू शुभ आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे तर अक्षता हे शुभ संकेत देतात.
- औक्षणाच्या वेळेस प्रज्वलित केला जाणारा दिवा भावाच्या जीवनात प्रकाश, ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक दर्शवते.
- पूजेनंतर भावाला खायला दिली जाणारी मिठाई शुभ मानली जाते. याद्वारे जीवनातील गोडवा टिकून राहावा, असा संदेश असतो.
- काही लोक भावाच्या मनगटावर रक्षा सूत्र बांधतात, जे संरक्षण आणि बहिणीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते.
- श्रीफळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
भाऊबीज स्पेशल रांगोळी | Bhaubeej 2025 Rangoli Design
भाऊबीजेला दारासमोर काढा हटके रांगोळी
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)