Bhalachandra Sankashti Chaturthi 2026: हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. 6 मार्च 2026 रोजी 'भालचंद्र संकष्टी चतुर्थी' साजरी केली जाणार आहे. फाल्गुन महिन्यात येणारी ही चतुर्थी अत्यंत फलदायी मानली जाते. जीवनातील संकटे दूर करण्यासाठी आणि गणरायाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी व्रत करण्याची परंपरा आहे. यंदा ही तिथी 6 मार्च रोजी संध्याकाळी 5.53 वाजता सुरू होत असून, याच दिवशी चंद्रोदयव्यापिनी तिथीनुसार व्रत केले जाईल. या निमित्ताने चंद्रोदयाच्या वेळा, पूजेचा शुभ मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी सविस्तर जाणून घेऊया...
भालचंद्र संकष्टी चतुर्थी | Bhalachandra Sankashti Chaturthi 2026: | 6 March 2026
फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी भालचंद्र संकष्टी म्हणून ओळखली जाते. या दिवशी गणपती बाप्पाच्या भालचंद्र रुपाची पूजा केली जाते. हिंदू धर्मग्रंथांनुसार, भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास जीवनातील गंभीर समस्यांवर मात करण्यास मदत मिळते, असे म्हणतात. हे व्रत चार वर्षे किंवा 13 वर्षे करण्याचा सल्ला दिला जातो. हा कालावधी पूर्ण झाल्यावर व्रताचे उद्यापन करावे. व्रत करण्यासाठी 'चंद्रोदयव्यापिनी चतुर्थी' तिथी निवडली जाते. जर दोन दिवस चंद्रोदयव्यापिनी चतुर्थी असेल, तर उपवासासाठी पहिल्या दिवसाची निवड करावी.
भालचंद्र संकष्टी चतुर्थी 2026 तिथी | Bhalachandra Sankashti Chaturthi 2026 Tithi
- चतुर्थी तिथी आरंभ : 6 मार्च संध्याकाळी 5.53 वाजता होईल.
- चतुर्थी तिथी समाप्त : 7 मार्च संध्याकाळी 7.17 वाजता होईल.
- पहाटे उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा.
- भगवान गणेशाचे ध्यान करून व्रत पाळण्याचा आणि मौन धारण करण्याचा संकल्प करावा.
- संध्याकाळी पुन्हा स्नान करा, शक्य नसल्यास हात-पाय स्वच्छ धुऊन घ्यावे.
- यानंतर चौरंग मांडावा, त्यावर श्रीगणेशाची मूर्ती स्थापित करावी.
- शास्त्रोक्त विधीनुसार श्री गणेशाची षोडशोपचार पूजा करावी.
- संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला त्यांचा आवडता पदार्थ मोदक, सुपारी, मूग आणि दुर्वा अर्पण कराव्या.
- भगवान गणेशाची पूजा संपन्न झाल्यानंतर, चंद्रोदयाच्या वेळी चंद्रदेवांची गंध, फुले इत्यादी गोष्टी अर्पण करून पूजा करावी आणि अर्घ्य तसेच नैवेद्य अर्पण करावा. त्याच दिवशी व्रताचे पारण करावे.
- या व्रतामध्ये तेलकट पदार्थांचे सेवन करणे वर्ज्य आहे.
- अभिजित मुहूर्त दुपारी 12.10 ते दुपारी 12.57 वाजेपर्यंत असेल.
- गोधुली मुहूर्त संध्याकाळी 6.22 वाजेपासून ते संध्याकाळी 6.47 वाजेपर्यंत असेल.
- अमृत काळ मुहूर्त पहाटे 4.23 वाजेपासून ते पहाटे 6.06 (7 मार्च) वाजेपर्यंत असेल.
- विजय मुहूर्त दुपारी 2.30 वाजेपासून ते दुपारी 3.17 वाजेपर्यंत असेल
- ब्रह्म मुहूर्त पहाटे 5.03 वाजेपासून ते पहाटे 5.53 वाजेपर्यंत असेल.
Bhalachandra Sankashti Chaturthi 2026 Chandroday Time | Bhalachandra Sankashti Chaturthi 2026 Moon Rise Time
- अहमदनगर रात्री 9.13 वाजता
- अकोला रात्री 9.06 वाजता
- अमरावती रात्री 9.03 वाजता
- अलिबाग रात्री 9.20 वाजता
- छत्रपती संभाजीनगर रात्री 9.12 वाजता
- बीड रात्री 9.09 वाजता
- बुलडाणा रात्री 9.09 वाजता
- बेळगाव रात्री 9.11 वाजता
- भंडारा रात्री 8.55 वाजता
- भुसावळ रात्री 9.11 वाजता
- चंद्रपूर रात्री 8.55 वाजता
- धुळे रात्री 9.15 वाजता
- डोंबिवली रात्री 9.20 वाजता
- गाणगापूर रात्री 9.04 वाजता
- जळगाव रात्री 9.12 वाजता
- जालना रात्री 9.09 वाजता
- कल्याण रात्री 9.20 वाजता
- कोल्हापूर रात्री 9.13 वाजता
- लातूर रात्री 9.05 वाजता
- लेण्याद्री रात्री 9.16 वाजता
- महड रात्री 9.19 वाजता
- मोरगाव रात्री 9.16 वाजता
- मुंबई रात्री 9.21 वाजता
- नंदुरबार रात्री 9.18 वाजता
- नागपूर रात्री 8.57 वाजता
- नांदेड रात्री 9.03 वाजता
- नाशिक रात्री 9.18 वाजता
- नरसोबावाडी रात्री 9.13 वाजता
- ओझर रात्री 9.18 वाजता
- पाली रात्री 9.19 वाजता
- पणजी रात्री 9.13 वाजता
- पंढरपूर रात्री 9.09 वाजता
- परभणी रात्री 9.05 वाजता
- रांजणगाव रात्री 9.15 वाजता
- रत्नागिरी रात्री 9.17 वाजता
- सांगली रात्री 9.12 वाजता
- सातारा रात्री 9.15 वाजता
- सावंतवाडी रात्री 9.14 वाजता
- सिद्धटेक रात्री 9.13 वाजता
- सोलापूर रात्री 9.07 वाजता
- ठाणे रात्री 9.21 वाजता
- थेऊर रात्री 9.16 वाजता
- उस्मानाबाद रात्री 9.07 वाजता
- वेंगुर्ले रात्री 9.15 वाजता
- विजापूर रात्री 9.07 वाजता
- वर्धा रात्री 8.59 वाजता
- यवतमाळ रात्री 9.01 वाजता
- पुणे रात्री 9.16 वाजता
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)