Blue Moon : एकाच महिन्यात दोन पौर्णिमा! 'या' आठवड्यात दिसणारा 'ब्लू मून' खास का आहे? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Blue Moon May 2026: अवकाश निरीक्षणाची आवड असणाऱ्या लोकांसाठी मे महिन्याचा शेवट अत्यंत खास ठरणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Blue Moon May 2026: एकाच महिन्यात दोनदा पौर्णिमा येण्याचा हा दुर्मिळ योग आहे.
मुंबई:

Blue Moon May 2026: अवकाश निरीक्षणाची आवड असणाऱ्या लोकांसाठी मे महिन्याचा शेवट अत्यंत खास ठरणार आहे. या आठवड्यात आकाशात चंदेरी प्रकाशाची उधळण करणारा पूर्ण चंद्र दिसेल, ज्याला खगोलशास्त्राच्या भाषेत 'ब्लू मून' असं म्हटलं जातं. एकाच महिन्यात दोनदा पौर्णिमा येण्याचा हा दुर्मिळ योग असून, तो पाहण्यासाठी जगभरातील खगोलप्रेमी सज्ज झाले आहेत.

एकाच महिन्यात दोनदा पौर्णिमा का?

साधारणपणे दर महिन्यात एक पौर्णिमा येते, मात्र या मे महिन्यात निसर्गाचं वेगळं गणित पाहायला मिळत आहे. या महिन्याची पहिली पौर्णिमा 1 मे रोजी होती आणि आता 31 मे रोजी पुन्हा एकदा पूर्ण चंद्र आकाशात झळाळणार आहे. जेव्हा एकाच कॅलेंडर महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येतात, तेव्हा त्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला 'ब्लू मून' असे संबोधले जाते. हा बदल केवळ कॅलेंडरमधील दिवसांच्या गणितामुळे घडून येतो.

Advertisement

नाव 'ब्लू मून' असलं तरी...

अनेकांना असं वाटतं की या रात्री चंद्र निळ्या रंगाचा दिसेल, पण प्रत्यक्षात तसं नसतं. 'ब्लू मून' हे केवळ एक नाव असून चंद्राच्या रंगाशी त्याचा कोणताही संबंध नाही. चंद्र नेहमीप्रमाणेच त्याच्या नैसर्गिक रंगात दिसेल. हे नाव मुळात आपल्या कॅलेंडरमधील तारखा आणि चंद्राच्या फिरण्याचा वेग यांच्यातील ताळमेळ बसवण्यासाठी वापरलं जातं.

( नक्की वाचा : Dalda Story : भारतीय किचनवर 90% ताबा असणारा डालडा अचानक गायब का झाला? 'ब्रँड' ते 'बॅड' प्रवासाचं कारण काय? )

काय आहे यामागचं विज्ञान?

चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 29.5 दिवस लागतात. आपल्या कॅलेंडरमधील महिने हे 30 किंवा 31 दिवसांचे असतात. या फरकामुळे दर काही वर्षांनी एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येण्याचा योग जुळून येतो. जर आपण सौर वर्षाचा विचार केला, तर काही वर्षांमध्ये 12 ऐवजी 13 पौर्णिमा येतात. याच वाढीव पौर्णिमेला जगभरात 'ब्लू मून' म्हणून ओळखलं जातं.

( नक्की वाचा : भारताचा सातवा दरवाजा ते मेक्सिकोचे पाताल लोक; या 7 जागा उघडण्याचं धाडस कोणतंही सरकार का करत नाही? )

पुढच्या 'ब्लू मून'साठी करावी लागणार प्रतीक्षा

खगोलशास्त्राच्या 'सीझनल मेथड'नुसार विचार केला, तर तांत्रिकदृष्ट्या या आठवड्यात दिसणारा चंद्र हा खरा 'ब्लू मून' नाही. खगोलशास्त्रीय नियमांनुसार, खऱ्या अर्थाने तांत्रिक निकषात बसणारा 'ब्लू मून' पाहण्यासाठी आता आपल्याला 20 मे 2027 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तरीही, एकाच महिन्यात दोनदा पूर्ण चंद्र पाहण्याचा हा अनुभव खगोलप्रेमींसाठी नक्कीच आनंददायी ठरेल.

Topics mentioned in this article