"मी कसा दिसतो?" या चिंतेने ग्रासलेत भारतीय तरुण; AIIMS च्या संशोधनातून धक्कादायक वास्तव उघड

'जर्नल ऑफ एज्युकेशन अँड हेल्थ प्रमोशन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, लठ्ठ आणि कमी वजन असलेल्या दर दोनपैकी एका तरुणाला मध्यम ते तीव्र स्वरूपाचा मानसिक त्रास होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

तरुण भारतीयांमध्ये शरीराच्या रचनेबद्दलची भीती किंवा चिंता ही एक गंभीर मानसिक समस्या म्हणून समोर येत आहे. 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (AIIMS) आणि ICMR ने केलेल्या एका ताज्या संशोधनातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे की, केवळ लठ्ठपणाच नाही, तर कमी वजन असलेल्या तरुणांमध्येही प्रचंड मानसिक ताण दिसून येत आहे.

भारतामध्ये तरुणांच्या शारीरिक वजनापेक्षा त्यांच्या मानसिक स्थितीवर शरीराच्या प्रतिमेचा मोठा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. 'जर्नल ऑफ एज्युकेशन अँड हेल्थ प्रमोशन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, लठ्ठ आणि कमी वजन असलेल्या दर दोनपैकी एका तरुणाला मध्यम ते तीव्र स्वरूपाचा मानसिक त्रास होत आहे.

(नक्की वाचा-  HSRP नंबर प्लेटची मुदत संपली; आता होणार थेट कारवाई, किती दंड बसू शकतो?)

संशोधनातील मुख्य निष्कर्ष

AIIMS मधील ओपीडीमध्ये आलेल्या 18 ते 30 वयोगटातील 1071 तरुणांवर हे संशोधन करण्यात आले. यात प्रामुख्याने मध्यमवर्गीय घरातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

लठ्ठ असलेल्या 49% तरुणांना शरीराच्या रचनेबद्दल तीव्र चिंता. त्यांच्यामध्ये स्वतःबद्दलची जाणीव आणि आत्मविश्वासाची कमतरता जास्त दिसून आली. कमी वजन असलेल्या 47% तरुणांना मानसिक ताण आहे. त्यांच्यात चिंता, एकटेपणा आणि लाज वाटण्याचे प्रमाण अधिक आढळले. सामान्य वजन असलेल्यांच्या तुलनेत लठ्ठ तरुणांमध्ये ताणाचे प्रमाण 3 पट, तर कमी वजन असलेल्यांमध्ये 2 पट अधिक आहे.

Advertisement

"केवळ वजन कमी करणे पुरेसे नाही"

AIIMS च्या मेडिसिन विभागातील प्रो. पीयूष रंजन यांनी सांगितले की, वजन व्यवस्थापन म्हणजे केवळ कॅलरी कमी करणे किंवा वजन वाढवणे नव्हे. जर तरुणांच्या भावनिक समस्यांकडे दुर्लक्ष केले, तर ते जीवनशैली बदलण्याच्या कार्यक्रमांमधून लवकर बाहेर पडतात.

(नक्की वाचा- Dhule Crime: लाठ्याकाठ्या तलवारीने हल्ला, गोळीबार... शीख बांधवांमध्ये तुफान राडा, धुळ्यात खळबळ)

पोषण आहारासोबतच मानसिक आरोग्याची तपासणी करणे आता अनिवार्य झाले आहे. अभ्यासात असे दिसून आले की, लोक 'मदत' करण्याच्या नावाखाली शरीरावर ज्या कमेंट्स करतात, त्या तरुणांना सामाजिकरित्या एकाकी बनवतात. अनेकांना तर घराबाहेर पडण्याची भीती वाटते. त्यामुळे ते सर्वांपासून वेगळे होतात.

Advertisement

भारतात वजन कमी करण्याच्या 'कॅलरी-सेंट्रिक' पद्धतीमध्ये आता मानसिक आरोग्याचा समावेश करण्याची नितांत गरज असल्याचे या संशोधक आणि पीएचडी स्कॉलर वारिशा अनवर यांनी अधोरेखित केले आहे.

Topics mentioned in this article