NHSRCL Recruitment 2026: भारतातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर म्हणजेट बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम अत्यंत वेगाने सुरु आहे. हा प्रकल्प साकारणाऱ्या 'नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड' (NHSRCL) कंपनीने मोठी पदभरतीची घोषणा केली आहे.
कंपनीकडून सध्या विविध तांत्रिक ट्रेडमधील २३७ तंत्रज्ञ (Technician) पदांसाठी भरती सुरु आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ५ ऑगस्टपर्यंत अधिकृत वेबसाइट nhsrcl.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे सिव्हिल/ट्रॅक फिटर, मेकॅनिक, ड्राफ्ट्समन, सर्व्हेयर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, प्लंबर, पेंटर, इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग आणि टेलिकॉम, तसेच रोलिंग स्टॉक टेक्निशियन यांसारख्या पदांवरील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Tourist Place: पावसाळ्यात फिरायचा प्लॅन करताय? पुण्याजवळील 'ही' पर्यटनस्थळं राहणार बंद
कोणकोणत्या पदांसाठी भरती? NHSRCL Recruitment Vacancy Details
- इलेक्ट्रिकल टेक्निशियन - ७७ पदे
- सिग्नलिंग आणि टेलिकॉम टेक्निशियन - ६३ पदे
- सिव्हिल/ट्रॅक फिटर - १८ पदे
- सिव्हिल/ट्रॅक मेकॅनिक - १६ पदे
- रोलिंग स्टॉक इलेक्ट्रिशियन - १३ पदे
- रोलिंग स्टॉक फिटर - १० पदे
उर्वरित रिक्त जागा सिव्हिल/ट्रॅक ड्राफ्ट्समन, सर्व्हेयर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, प्लंबर, पेंटर, मशिनिस्ट, रोलिंग स्टॉक वेल्डर आणि RAC टेक्निशियन या पदांसाठी आहेत.
काय आहे पात्रता? Eligibility Criteria
टेक्निशियन पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालीलपैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे:
- मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक्युलेशन/SSLC आणि संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र, किंवा
- मॅट्रिक्युलेशन/SSLC आणि संबंधित ट्रेडमधील शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship), किंवा
- संबंधित अभियांत्रिकी शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा.
याव्यतिरिक्त, उमेदवारांकडे भारतीय रेल्वे, सरकारी मालकीची किंवा सरकारी संचालित रेल्वे, मेट्रो रेल किंवा प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) च्या ऑपरेशन्स आणि देखभाल (Operations and Maintenance) विभागांमध्ये किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारांना वैध अनुभव किंवा क्षमता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. पात्रता आणि अनुभवाची गणना ३० जून २०२६ रोजीच्या स्थितीनुसार केली जाईल.
वेतन आणि नियुक्ती| Salary And Posting
निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती NE-2 वेतन श्रेणीअंतर्गत 'ॲबसॉर्प्शन बेसिस'वर (Absorption Basis) केली जाईल आणि त्यांना ३५,००० ते १,१०,००० रुपये दरम्यान वेतन मिळेल. नियुक्ती NHSRCL किंवा मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (MAHSR) प्रकल्पांतर्गत कोठेही केली जाऊ शकते.
कशी असेल निवड प्रक्रिया? Selection Process
- संगणक-आधारित परीक्षा (CBT)
- कागदपत्रांची पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
अधिसूचित केलेल्या सर्व पदांसाठीची CBT एकाच दिवशी आणि एकाच वेळी घेतली जाईल. परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर (website) प्रसिद्ध केले जाईल. सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवडीपूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचा परिविक्षा कालावधी (probation period) पूर्ण करणे आवश्यक असेल. यासाठी वयोमर्यादा 35 वर्ष असेल
अर्ज शुल्क किती?| Application Fee
सामान्य (General), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सवलत देण्यात आली आहे.
दरम्यान, उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी त्यांनी NHSRCL च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर अधिसूचना वाचावी.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world