Cardamom Elaichi Benefits: वेलची थंड का गरम ? रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलची खाल्ल्यास काय होते?

Cardamom Elaichi Benefits: वेलची खाल्ल्याने तोंडाला येणारा दुर्गंध दूर होतो. वेलचीचे याशिवाय इतरही बरेच फायदे आहेत. वेलची ही दिसायला छोटी असली तर ती आरोग्यासाठी चांगली असल्याचे मानले जाते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Cardamom Elaichi Benefits: वेलची ही आपल्या सगळ्यांच्या किचनमधे सहजपणे सापडते. छोटीशी वेलची खाण्याचे बरेच फायदे आहेत. अनेकजण मुखशुद्धीसाठी वेलची खातात. कारण वेलची खाल्ल्याने तोंडाला येणारा दुर्गंध दूर होतो. मात्र वेलचीचे इतरही बरेच फायदे आहेत. वेलची ही दिसायला छोटी असली तर तिचा आरोग्यासाठी चांगला फायदा होतो. खासकरून रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलची खाल्ल्यास त्याचा प्रकृतीवर चांगला परिणाम होतो. रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलची खाऊन त्यावर कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. वेलची पचनक्रिया सुधारण्यासाठी, चित्त एकाग्रतेसाठी, श्वसनासंदर्भातील तक्रारी दूर करण्यासाठी आणि शरीराच्या शुद्धीकरणासाठी फायदेशीर ठरते. शरीरातील कुठल्या भागाला सूज आली असेल किंवा त्वचेशी संबंधित विकार असतील तर त्यापासून लवकर आरामा पडावा यासाठीही वेलची फायदेशीर ठरते असे सांगितले जाते.  

नक्की वाचा: Ghee Benefits: रोज कोमट पाण्यात 1 चमचा तूप मिक्स करून प्यायल्यास काय होतं? न्युट्रिशनिस्टने सांगितले 5 फायदे

वेलची गरम असते का थंड?

बाजारात दोनप्रकारच्या वेलची उपलब्ध असतात. यातील एक वेलची ही शरीरासाठी थंड असते तर दुसऱ्या प्रकारची वेलची ही शरीरासाठी उष्ण असते. वेलचीचा रंग कोणता आहे यावरून आपण कोणती वेलची थंड आणि कोणती वेलची गरम यातील फरक करू शकतो. हिरव्या रंगाची वेलची ही शरीरासाठी थंड असते. काळ्या रंगाची वेलची ही शरीरासाठी उष्ण असते.  

रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलची खाल्ल्यास काय होतं? (What are the benefits of eating cardamom at night?)

आता आपण मूळ मुद्दाकडे वळूयात. रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलची खाल्ल्यास त्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो असे म्हणतात. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे झोप चांगली लागण्यास मदत होते. याशिवाय पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याआधी सांगितल्याप्रमाणे वेलची तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करते आणि त्यामुळे आपला मूड सुधारण्यासही मदत होते. वेलचीमुळे डोकं शांत होण्यास मदत होते, ज्यामुळे शांत झोप लागते.  

Advertisement

नक्की वाचा: Clove Tea Benefits: चहामध्ये लवंग मिक्स करुन प्यायल्यास काय होतं? या लोकांनी नक्की करावा हा उपाय

वजन कमी करण्यासही मदत करते वेलची 

वजन घटविण्यासाठी तुम्ही जीवतोड प्रयत्न करत असाल तर वेलची तुमच्या प्रयत्नांना अधिक बळ देणारी ठरू शकते. रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी पिफे फायदेशीर ठरू शकते. यामुळे मेटाबॉलिजम सुधारते आणि कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)