Clove Tea Benefits: चहा हा शब्द ऐकताच चहाप्रेमी खूश होतात. भारतात चहा केवळ पेय नाहीय तर भावना आहे. शारीरिक थकवा, आळस दूर करण्यासाठी आणि ऊर्जा मिळावी, यासाठी काही लोक चहा पितात. हिवाळ्यातही ऊब मिळावी, यासाठी लोक चहा जास्त प्रमाणात पितात. पण थंडीच्या दिवसांत चहामध्ये लवंगही मिक्स करुन प्यायल्यास आरोग्यवर्धक फायदे मिळतील. लवंगमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, फॉलेट, मॅग्नीज, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, फॉस्फरस, झिंक आणि कॉपर यासारख्या गुणधर्मांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त लवंगमध्ये फायबर, कार्बोहायड्रेट आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात.
लवंगचा चहा कसा तयार करावा? (How To Make Clove Chai At Home)
सामग्री :
- पाणी
- चहा पावडर
- लवंग
- आले
- साखर
- दूध
(नक्की वाचा: Better Sleep Tips: रात्री झोपण्यापूर्वी केवळ 1 चमचा खा ही गोष्ट, इतकी गाढ झोप येईल की अलार्मही ऐकू येणार नाही)
लवंग चहाची स्टेप बाय स्टेप रेसिपी
- एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवा.
- पाण्यात आले आणि लवंगत ठेवा उकळा
- थोड्या वेळाने चहा पावडर मिक्स करा.
- यानंतर दूध आणि साखरही मिक्स करा.
- चहा गाळून प्यावा.
(नक्की वाचा: Garlic With Desi Ghee Health Benefits: लसूण तुपात फ्राय करून खाल्ल्यास काय होतं?)
चहामध्ये लवंग मिक्स करण्याचे फायदे (Clove Tea Benefits In Marathi)
1. पचनप्रक्रिया
लवंगचा चहा प्यायल्यास पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. यामुळे पोट फुगणे, अपचन यासारख्या समस्या दूर होतील.
2. घशातील खवखव
3. रोगप्रतिकारकशक्ती(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

