Medicine for diabetic : मधुमेहावर भारतात नवं औषध, रक्तातील साखर-वजन दोन्ही नियंत्रित करणार, जाणून घ्या किंमत

हे औषध कोणत्या रुग्णांवर परिणामकारक ठरेल याबाबत डीएससीओने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

New medicine for diabetes : केंद्र सरकारकडून टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी एक चांगली बातमी आहे. यासाठी केंद्र सरकारने डेन्मार्कच्या औषधाला मान्यता दिली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) सेमाग्लुटाइड (Semaglutide) हे औषध भारतीय बाजारात आणण्यास मान्यता दिली आहे. ओझेम्पिक  (Ozempic)  म्हणूनही ओळखले जाणारे हे औषध इंजेक्शन म्हणून बाजारात उपलब्ध असेल. सेमाग्लुटाइड शरीरात इन्सुलिनसारखं काम करतं आणि ग्लुकागॉनसारखे पेप्टाइड-1 रिसेप्टर अ‍ॅगोनिस्ट नावाच्या औषधांच्या वर्गाशी संबंधित आहे.

नवं औषध कोणत्या रुग्णांसाठी उपयुक्त?

ज्या रुग्णांच्या रक्तातील साखर केवळ आहार आणि व्यायामाने नियंत्रित करता येत नाही किंवा मेटफार्मिन नावाच्या औषधांना प्रतिसाद देऊ न शकणाऱ्या रुग्णांसाठी हे औषध तयार करण्यात आलं आहे. 

हृदयविकारापासून वजन कमी करायला मदत...

या औषधामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारखा हृदयरोगाचा धोका कमी होईल. जगभरात या औषधांवर क्लिनिकल चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातून हे औषध वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरेल. त्यामुळे लठ्ठपणाशी झुंज देणाऱ्यांनाही हे औषध फायदेशीर मानले जात आहे.

नक्की वाचा - चालताना अजिबात करू नका 'या' 5 चूका, Walk करण्याची योग्य वेळ कोणती? 99 टक्के लोकांना माहितच नाही

डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषध घेऊ नका

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात सध्या अंदाजे 10 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि भविष्यात हा आकडा 13.6 कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.  सीडीएससीओशी संबंधित एका सूत्राने सांगितले, आधीच्या औषधांचा परिणाम न होणाऱ्या रुग्णांसाठी नवं औषध प्रभावी ठरू शकतं. मात्र लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषध घेऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

औषधाची किंमत एक मोठे आव्हान

Advertisement

अमेरिका आणि युरोपमध्ये हे औषध खूप महाग आहे. भारतात मात्र याची किंमत अद्याप समोर आलेली नाही. भारतात बहुतेक मधुमेहाचे रुग्ण मध्यम आणि कमी उत्पन्न गटातील आहेत, तेथे हे औषध किती परवडणारे असेल हे पाहायला हवं. 

Topics mentioned in this article