Chaitra Pournima 2026: हिंदू धर्मात चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. याच दिवशी भगवान हनुमानाचा जन्मोत्सवही साजरा केला जातो. पण वर्ष 2026मध्ये चैत्र पौर्णिमेच्या तिथीबाबत लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे, कारण यावर्षी ही तिथी दोन दिवस येत आहे. चला तर मग जाणून घेऊया चैत्र पौर्णिमा कधी आहे आणि कोणत्या शुभ मुहूर्तावर पूजा करावी?
चैत्र पौर्णिमा 2026 तिथी | चैत्र पौर्णिमा कधी आहे | Chaitra Pournima 2026 | Chaitra Purnima 2026
पंचांगानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 07.07 वाजता आरंभ होत असून 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 07.42 वाजता तिथी समाप्त होत आहे. म्हणजेच चैत्र पौर्णिमा तिथी दोन्ही दिवशी असेल.
चैत्र पौर्णिमा व्रत कोणत्या दिवशी करावा? | Chaitra Purnima 2026 Vrat
धार्मिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमेचा उपवास 2 एप्रिल (गुरुवार) रोजी करावा, कारण हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते ती ग्राह्य धरली जाते.
स्नान आणि दानासाठी योग्य दिवस कोणता?दुसरीकडे स्नान आणि दानासाठी उदया तिथी म्हणजेच सूर्योदयाच्या वेळच्या तिथीला महत्त्व दिले जाते. 2 एप्रिलच्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असेल, त्यामुळे या दिवशी पवित्र स्नान आणि दान करणे शुभ मानले गेले आहे.
(नक्की वाचा: Hanuman Jayanti 2026:पृथ्वीवर नेमके कुठे राहतात पवनपुत्र हनुमान? जाणून घ्या बजरंगबलीच्या पवित्र पर्वताचे रहस्य)
चैत्र पौर्णिमा तिथीच्या दिवशी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्तश्री सत्यनारायण पूजा 1 एप्रिल रोजी (बुधवार) दिवशी प्रदोष काळात करावी.
1 एप्रिल 2026 शुभ मुहूर्त
- ब्रह्म मुहूर्त स्नान : पहाटे 4.39 वाजेपासून ते पहाटे 5.25 वाजेपर्यंत आहे.
- अमृत काळ: सकाळी 8.48 वाजेपासून ते सकाळी 10.28 वाजेपर्यंत
- विजय मुहूर्त: दुपारी 2.30 वाजेपासून ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत आहे.
- गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 6.38 वाजेपासून ते संध्याकाळी 7.01 वाजेपर्यंत आहे.
- अभिजीत मुहूर्त: दुपारी 12 वाजेपासून ते दुपारी 12.50 वाजेपर्यंत आहे.
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोणते शुभ योग जुळून आले आहेत?
- यंदा चैत्र पौर्णिमेला अनेक शुभ योग जुळून येत आहेत, ज्यामुळे पूजेचे अधिक लाभ मिळू शकतात.
- 1 एप्रिल रोजी सकाळी 6.11 वाजता ते दुपारी 4.17 वाजेपर्यंत रवि योग जुळून आला आहे.
- दुपारी 4.17 ते दुसऱ्या दिवशी (2 एप्रिल) सकाळी 6.10 वाजेपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे
- याशिवाय वृद्धी आणि ध्रुव योगाचाही प्रभाव राहील.
चैत्र पौर्णिमेच्या या दिवशी काय करावे?
- चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते.
- सत्यनारायण कथा ऐकणे आणि चंद्राला दूध मिश्रित जलाने अर्घ्य अर्पण करणे शुभ मानले जाते.
- तसेच हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण केल्याने मनाला शांती मिळते आणि जीवनात सकारात्मकता येते, असे म्हणतात.
Photo Credit: NDTV Marathi
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)