
Chandra Grahan Sutak Time dos and don't : 2025 वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण आज भाद्रपद पौर्णिमा 7 सप्टेंबर 2025, रविवारी लागणार आहे. हे चंद्रग्रहण भारतासह जगभरातील सर्व देशांमध्ये पाहता येईल. सनातन परंपरेत चंद्रग्रहण (Chandra Grahan 2025) आणि सुर्यग्रहणाच्या (Surya Grahan 2025) घटना अशुभ मानल्या जातात. यासाठी काही तास सूतकही पाळलं जातं.
चंद्रग्रहणाची वेळ (Chandra Grahan Time)
पंचांगानुसार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025(रविवार) रोजी असणार आहे. त्याचा सूतक काळ 9 तासांपूर्वी म्हणजे दुपारी 12:57 वाजता सुरू होईल. चंद्रग्रहण रात्री 9:58 वाजता सुरू होईल 8 सप्टेंबरला 01:26 (AM) वाजता संपेल.
सूतकादरम्यान काय कराल आणि काय टाळाल?
- लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठातील पुरोहित विभागाचे प्राध्यापक रामराज उपाध्याय यांनी सूतकादरम्यान काय करावं आणि काय टाळावं याची माहिती दिली.
- चंद्रग्रहणाच्या दिवशी सुतकाचे नियम (Chandra Grahan Sutak Rules)
- सूतक सुरू झाल्यानंतर व्यक्तीने घराबाहेर पडणे आणि धावपळीशी संबंधित कोणतेही काम करणं टाळावं. ग्रहणाची सावली स्वत:वर पडू देऊ नये.
- सूतक सुरू झाल्यानंतर चुकूनही कोणतं शुभ कार्याची सुरुवात करू नये. तुम्ही कार्यालय किंवा घरातील तुमचं नेहमीचं काम करू शकता. त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही.
- सूतक सुरू झाल्यानंतर व्यक्तीने पवित्र ठिकाणी बसून देवाचं चिंतन करावं. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या कुटुंबातील देवतांचे किंवा तुमच्या पूजनीय देवतांचे चिंतन, जप आणि कीर्तन करू शकता.
- हिंदू मान्यतेनुसार, सूतक काळात जर एखादी व्यक्ती कोणत्याही इच्छेसाठी देवी-देवताची पूजा-अर्चा करते आणि जप केलं तर या शुभ फळातून ग्रहण दोष दूर होतो. त्याची मनोकामनाही पूर्ण होते.
- सूतक कालात व्यक्तीने कोणाबद्दलही वाईट विचार करू नये. असं काहीही करू नये ज्यामुळे ग्रहण दोषासह पाप लागेल.
- हिंदू मान्यतेनुसार, व्यक्तीला सूतक काळात शिजवलेले आणि आधीच तयार करून ठेवलेलं अन्न ग्रहण करू नये. जर व्यक्तीला भूक लागली तर फळ आदी पदार्थ खाऊ शकता.
- ग्रहणादरम्यान अन्न शिजवण्यास मनाई आहे. जर तु्म्ही आधीच अन्न शिजवून ठेवलं असेल तर त्यात तुळशीचं पान ठेवून खाऊ शकता. यातून ग्रहणाचा प्रभाव त्यावर राहणार नाही. ग्रहणानंतर स्नान-ध्यान केल्यानंतर ताजं अन्न खाणं केव्हाही चांगलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world