Chandra Grahan 2026 : चंद्रग्रहण काळात आकाशात पाहू शकतो का? ज्योतिषाचार्यांकडून शुभ-अशुभ परिणाम जाणून घेऊया

Chandra Grahan 2026: ग्रहणाच्या वेळी आकाशात पाहू शकतो की नाही. ज्योतिषाचार्य डॉक्टर गौरव कुमार दीक्षित यांच्याकडून उत्तर जाणून घेऊया. चंद्रग्रहण पाहिल्याने व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम होतो हेदेखील जाणून घेऊया.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chandra Grahan 2026: ३ मार्च २०२६ रोजी धुलिवंदनाच्या दिवशी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. हे एक पूर्ण चंद्रग्रहण असेल. हे चंद्रग्रहण भारतातून दिसेल. मात्र याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या काळात असाही सवाल उपस्थित होतो की, ग्रहणाच्या वेळी आकाशात पाहू शकतो की नाही. ज्योतिषाचार्य डॉक्टर गौरव कुमार दीक्षित यांच्याकडून उत्तर जाणून घेऊया. चंद्रग्रहण पाहिल्याने व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम होतो हेदेखील जाणून घेऊया.

धुलिवंदनाला पूर्ण चंद्रग्रहण लागणार, जाणून घ्या काय कराल आणि काय टाळाल?

NDTV सोबत झालेल्या खास बातचीतमध्ये ज्योतिषाचार्य डॉक्टर गौरव कुमार दीक्षित यांनी सांगितलं, हे चंद्रग्रहण सिंह राशी आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रमध्ये लागेल. भारतीय वेळेनुसार, चंद्रग्रहण दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल आणि सायंकाळी साधारण ६ वाजता पूर्णपणे दिसू शकेल.

सूतक काळ केव्हापासून सुरू होईल?

चंद्रग्रहणाचा सूतक काळ साधारण ९ तासांपूर्वी सुरू होईल. यानुसार ३ मार्चला सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सूतक काळाला सुरुवात होईल. सूतक काळादरम्यान शुभ आणि मंगल कार्य केले जात नाहीत. मंदिरांची दारं बंद केले जातात आणि मूर्ती पूजा टाळली जाते.

ग्रहणाच्या काळात आकाशात पाहू शकतो की नाही?

ज्योतिषाचार्य यांनी सांगितलं, हे चंद्रग्रहण सिंह राशीत लागेल. सिंह राशी आणि पूर्वांफाल्गुनी नक्षत्रमध्ये लागणाऱ्या ग्रहणाचा वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळा परिणाम होईल.

कर्क, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या जातकांनी हे ग्रहण पाहू नये. याशिवाय ज्या लोकांची जन्मकुंडलीत चंद्र कमकुवत, पाप ग्रहांनी पीडित किंवा नीच राशीमध्ये स्थित आहे त्यांनीही ग्रहण पाहणं टाळावं. ग्रहण पाहिल्याने या राशीच्या जातकांना आर्थिक नुकसान आणि आजारांशिवाय मानसिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. गर्भवती महिलांनीही ग्रहणादरम्यान घराबाहेर पडणे आणि आकाश पाहणं टाळावं. त्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी आणि घराच्या आतच राहायला हवं.

Advertisement

ग्रहणाच्या वेळी काय कराल?

ग्रहणादरम्यान मंत्र, जप, ध्यान आणि देवाच्या नावाचं स्मरण करणं शुभ मानलं जातं. ग्रहण समाप्त झाल्यानंतर स्नान करावं आणि घराची साफ-सफाई करणं शुभं मानलं जातं.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Topics mentioned in this article