Chandra Grahan 2026: 15 दिवसात दुसरं ग्रहण, या कारणामुळे भारत सरकारने राहावं सतर्क, ज्योतिषींचा मोठा इशारा

Chandra Grahan 2026 Effect On India: चंद्रग्रहणाचा भारतासह अन्य देशांवर कोणत्या प्रकारे परिणाम होणार, याबाबत ज्योतिषाचार्य रामविलास चतुर्वेदी यांनी दिलेली माहिती सविस्तर जाणून घ्या...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Chandra Grahan 2026 News: चंद्र ग्रहणाचा भारत देशावर काय होणार परिणाम?"
AI

Chandra Grahan 2026 Effect On India: वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज (3 मार्च) लागले. हे ग्रहण भारतामध्ये अंशतः दिसणार असले तरीही ज्योतिषशास्त्रीय माहितीनुसार जागतिक स्तरावर याचे परिणाम संवेदनशील मानले जात आहेत. चंद्रग्रहण (Chandra Grahan News) दुपारी 3.20 वाजता सुरू झाले असून संध्याकाळी 6.47 वाजता ग्रहण काळ संपुष्टात येईल. या संदर्भात मथुरेचे ज्योतिषाचार्य रामविलास चतुर्वेदी यांनी भारत आणि इतर देशांवर या ग्रहणाचा कसा परिणाम होईल, याबाबत सविस्तर माहिती दिली ते जाणून घेऊया... 

भू-राजकीय तणाव किंवा युद्धासारखी परिस्थिती | Chandra Grahan 2026 | Lunar Eclipse 2026 Time

ज्योतिषाचार्य रामविलास चतुर्वेदी यांच्या मते, एकाच महिन्यात दोन ग्रहणांचा योग जुळून आल्याने अंतर्गत अशांतता आणि जागतिक स्तरावर भू-राजकीय तणाव किंवा युद्ध यासारख्या परिस्थिती अधिक गुंतागुंतीच्या ठरू शकतात. आयएएनएस (IANS) या वृत्तसंस्थेशी बातचीत करताना ज्योतिषी म्हणाले की, "3 मार्च रोजीचे चंद्रग्रहण हे 'ग्रस्तोदय' चंद्रग्रहण आहे. ईशान्य भागात हे दुपारी 3.20 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 6.47 वाजेपर्यंत असेल. हे ग्रस्तोदय ग्रहण असल्याने ज्या भागात सूर्य साधारण दुपारी 4 - 4.30 वाजेदरम्यान मावळतो, तेथे ते दिसेल; पण मध्य किंवा पश्चिम भारतात हे ग्रहण दिसणार नाही.

भारतावर चंद्रग्रहणाचा परिणाम कसा असेल? | Chandra Grahan 2026 News | Lunar Eclipse 2026

ग्रहणाच्या परिणामाबाबत बोलताना आचार्य चतुर्वेदी म्हणाले की, भारतावर याचा प्रभाव कमी असेल कारण भारत देशाची रास धनु आहे आणि ग्रहण सिंह राशीत आहे, तेही मघा नक्षत्रात लागत आहे. मघा नक्षत्रातील ग्रहण निसर्गावर खोलवर परिणाम करते. हे ग्रहण केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आक्रोशाची स्थिती निर्माण करू शकते. तसेच एका महिन्यात दोन ग्रहण लागणे हे अजिबात चांगले संकेत मानले जात नाहीत.

(नक्की वाचा: Chandra Grahan 2026: धूलिवंदनाच्या दिवशी लागणाऱ्या चंद्रग्रहणाला ग्रस्तोदित का म्हटलंय जातंय? ज्योतिषींकडून सोप्या भाषेत जाणून घ्या अर्थ)

कोणत्या देशांसाठी हे चंद्र ग्रहण अशुभ ठरेल?

ज्योतिषाचार्यांनी पुढे सांगितले की, "15 दिवसांपूर्वी सूर्यग्रहण झाले होते आणि आता चंद्रग्रहण लागले आहे. एकाच महिन्यात दोन ग्रहण आल्यास राज्यकर्त्यावर किंवा सैन्यावर संकट येते, असे म्हणतात. याचा प्रभाव सध्या मध्यपूर्व भागात पाहायला मिळत आहे. इराणमधील एका महत्त्वाच्या आणि सुरक्षित व्यक्तीचा मृत्यू झाला, हा या ग्रहणांचाच आणि ग्रहांचा प्रभाव मानला जातोय. भारतात सिंह राशीत लागणारे हे ग्रहण प्रगती देईल, पण अंतर्गत कलह देखील वाढवेल. त्यामुळे सरकारने अंतर्गत कलहबाबत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे."

Advertisement

(नक्की वाचा: Chandra Grahan 2026 LIVE: भारतात चंद्रग्रहणाला सुरुवात, महाराष्ट्रात कुठे आणि किती वेळ दिसणार ग्रहण? वाचा सविस्तर)

ग्रहण काळात कोणती खबरदारी घेण्याची आवश्यकता?

चंदीगडचे पुजारी राम सागर मिश्रा यांनीही ग्रहणात सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. जरी भारतात याचा प्रभाव कमी असला तरी त्याचे नकारात्मक परिणाम दिसू शकतात. पुजारी मिश्रा यांच्या मते, या चंद्रग्रहणाचा प्रभाव अनेक राशींवर होईल आणि देशात विविध प्रकारच्या घटना किंवा आपत्ती येऊ शकतात. ग्रहणाचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी दानधर्म करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )