Children's Day 2025 Speech Ideas: बालदिनी भाषण करण्यासाठी 6 टिप्स, तुमच्या मुलासाठी टाळ्यांचा होईल कडकडाट

Children's Day 2025 Essay And Speech Ideas: बालदिनी भाषण करणार असाल तर फॉलो करा या टिप्स...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Children's Day 2025 Essay And Speech Ideas: बालदिनी भाषण करण्यासाठी सोप्या टिप्स"
Canva AI

Children's Day 2025 Essay And Speech Ideas: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन 'बालदिन' (Baldin 2025) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन जल्लोषात साजरा केला जातो. बालदिनानिमित्ताने शाळा, सोसायटींसह वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केलं जाते. शाळकरी विद्यार्थींसाठी निबंध, भाषणासह विविध स्पर्धाही आयोजित केल्या जातात. तुमची मुलं देखील भाषण स्पर्धेत सहभाग नोंदवणार असतील, या लेखाद्वारे तुम्हाला मदत मिळू शकते. बालदिनानिमित्त भाषण करण्यासाठी जाणून घेऊया काही टिप्स...

शाळकरी विद्यार्थ्यांसाठी बालदिनानिमित्त निबंध आणि भाषण स्पर्धेसाठी टिप्स | Children's Day 2025: Essay And Speech Ideas For Students 

भाषण 1 : 

नमस्कार सर्वांना,
आज आपण एक खूप खास दिवस साजरा करतोय 14  नोव्हेंबर, बालदिन! 
हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो.
नेहरूजींना मुलं खूप आवडायची, सर्व त्यांना प्रेमाने "चाचा नेहरू" म्हणायचे.
पंडित नेहरू म्हणायचे, "आजची मुलं उद्याचे नागरिक आहेत."
त्यांच्या मते मुलांमध्ये अपार शक्ती, कल्पनाशक्ती आणि प्रेम असते.
ते नेहमी सांगायचे की प्रत्येक मुलाला शिक्षण, प्रेम आणि संधी मिळाली पाहिजे.
मित्रांनो, आजच्या दिवशी आपण ठरवूया की शाळेत प्रामाणिकपणे अभ्यास करू, मोठ्यांचा आदर करू आणि चांगला माणूस होऊ.
आपण मेहनत केली तर आपला देश नक्की प्रगती करेल.
सर्वांना बालदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! धन्यवाद

भाषण 2  | Children's Day 2025 Speech Ideas 2

प्रिय शिक्षक आणि मित्रांनो
आज बालदिन आहे, आम्हा मुलांचा आनंदाचा दिवस!
हा दिवस फक्त मजा आणि खेळासाठी नाही तर स्वतःला ओळखण्यासाठीही आहे.
आपणा सर्वांमध्ये काही-न्-काही विशेष नक्कीच आहे, कुणाला चित्रकला येते, कुणाला गाणं, कुणाला खेळ!
आपण आपली कला जपली तर आपण खूप पुढे जाऊ शकतो.
चाचा नेहरू म्हणाले होते,"मुले फुलांप्रमाणे असतात, ही फुलं आपण प्रेमाने आणि काळजीने वाढवली पाहिजेत.
म्हणून आज आपण ठरवूया की आपण आनंदी राहू, इतरांनाही आनंद देऊ आणि देशाचं नाव उज्ज्वल करूया. 
धन्यवाद!

भाषण 3 | Children's Day 2025 Speech Ideas 3

नमस्कार सर्वांना
आज बालदिन आणि पंडित नेहरु यांची जयंती आहे.
आजचा दिवस आपल्यासाठी विशेष आहे. 
हा दिवस आपल्याला शिकवतो की प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणं गरजेचं आहे.
शिक्षण खूप महत्त्वाचं आहे, असे पंडित नेहरूजींचं म्हणणं होते. 
ते म्हणायचे, "शिक्षण हेच देशाच्या प्रगतीचं खरं साधन आहे."
जर प्रत्येक मुलगा-मुलगी शिकली, तर देशातील अंधार नाहीसा होईल.
मित्रांनो बालदिनानिमित्त आपण संकल्प करूया की
दररोज अभ्यास करू, प्रश्न विचारू आणि काहीतरी नवीन शिकू.
कारण ज्ञान हीच खरी ताकद आहे.
धन्यवाद आणि बालदिनाच्या शुभेच्छा!

Advertisement

भाषण 4  | Children's Day 2025 Speech Ideas 4

प्रिय शिक्षक आणि मित्रांनो,
आज आपण बालदिन साजरा करतोय पण हा दिवस शिक्षकांशिवाय अपूर्ण आहे.
शिक्षक आपल्याला फक्त अभ्यासाचे धडे शिकवत नाहीत तर ते आपल्याला जगायलाही शिकवतात.
ते आपल्याला चांगलं आणि वाईट यातील फरक ओळखायला शिकवतात.
आज आपण सर्वजण शिक्षकांना धन्यवाद म्हणूया.
कारण त्यांच्या प्रयत्नांमुळे आपण भविष्यात काहीतरी मोठं करू शकतो.
चाचा नेहरू म्हणाले होते,"शिक्षक आणि विद्यार्थी मिळून देश बदलू शकतात."
चला, आपण हे खरं करून दाखवूया!
धन्यवाद!

भाषण 5 | Children's Day 2025 Speech Ideas 5

मित्रांनो,
आज बालदिन आहे. या दिवशी आपण फक्त मजा न करता, चांगल्या सवयीही आत्मसात करूया.
रोज वेळेवर उठू, शाळेला जाऊ, अभ्यास करू आणि मोठ्यांचा आदर करू.
आपण रोज छोट्यामोठ्या चांगल्या गोष्टी केल्या तर आपला देशही चांगला बनेल.
चाचा नेहरू म्हणायचे,"मुलांना शिकवणं म्हणजे देशाला शिकवणं."
चला, आनंदाने बालदिन साजरा करू आणि काहीतरी नवीन शिकूया!
धन्यवाद!

Advertisement
भाषण 6 | Children's Day 2025 Speech Ideas 6

प्रिय शिक्षक आणि मित्रांनो,
चाचा नेहरूंनी आपल्याला देशभक्तीचा धडा दिला.
ते नेहमी म्हणायचे,"मुलं म्हणजे देशाचं भविष्य."
आपण चांगलं शिकून, मेहनत करून आणि एकमेकांवर प्रेम करून
भारत देशाला अधिक महान बनवू शकतो 
देशप्रेम म्हणजे फक्त झेंडा फडकावणं नाही 
तर आपलं काम प्रामाणिकपणे करणं हेही देशप्रेमच आहे 
म्हणून आज बालदिनी आपण ठरवूया 
आपण चांगले विद्यार्थी आणि चांगले नागरिक बनूया.
धन्यवाद!

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)